‘गोकुळ’ दूध संघ आणि सहकार क्षेत्रावरील हस्तक्षेपाविरोधात संताप…

कोल्हापूरकरांच्या ९ नोव्हेंबरच्या आंदोलनाला संगमनेरमधून जाहीर पाठिंबा !

संगमनेर / प्रतिनिधी 

लोकशाही मूल्यांना डावलून सहकार क्षेत्रावर आणि विशेषतः ‘गोकुळ’ दूध संघावर होत असलेल्या कथित शासकीय हस्तक्षेपाविरोधात कोल्हापूरमध्ये येत्या ९ नोव्हेंबर रोजी एका मोठ्या आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. या आंदोलनाला आता कोल्हापूरबाहेरूनही जोरदार पाठिंबा मिळू लागला असून, संगमनेर येथील ‘राहुल गांधी समर्थक संघ (RGSS)’ च्या वतीने या आंदोलनाला जाहीर पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. यासंदर्भात संगमनेर शहरात ठिकठिकाणी भव्य फलक (बॅनर) लावून तीव्र निषेध नोंदवण्यात आला आहे.

‘लोकशाहीची क्रूर हत्या’ – राहुल गांधी समर्थक संघाचा गंभीर आरोप

बॅनरवर नमूद केल्यानुसार, “मत जनतेचे, प्रतिनिधी जनतेचे, मग निर्णय सरकारच्या मर्जीने का?” असा संतप्त सवाल उपस्थित करण्यात आला आहे. तसेच, ‘गोकुळ’ दूध संघावर आलेली ही वेळ म्हणजे लोकशाहीची क्रूर हत्या असल्याचे सांगत, आज ‘गोकुळ’वर वेळ आली असून भविष्यात संपूर्ण सहकार क्षेत्रावर अशीच वेळ येईल, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.

आमदार सतेज (बंटी) पाटील यांच्या भूमिकेला बळ

या संपूर्ण संघर्षात आमदार सतेज (बंटी) पाटील यांच्यासोबत ठामपणे असल्याचे स्पष्ट करत, संगमनेरकरांनी त्यांच्या भूमिकेचे समर्थन केले आहे. कोल्हापूरकरांच्या या ९ नोव्हेंबरच्या आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळण्याची चिन्हे असून, सहकार क्षेत्राच्या स्वायत्ततेसाठी हा लढा तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आंदोलनाला पाठिंबा देणारे प्रमुख पदाधिकारी:

राहुल गांधी समर्थक संघ (RGSS), संगमनेरच्या वतीने खालील पदाधिकाऱ्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. प्रवीण हासे, सतीश खताळ, रवींद्र हासे, प्रतिक कोकणे, सचिन वाळे, राम अरगडे, अरुण चव्हाण, शांतनू भालेकर, प्रकाश कडलग, मोहसीन शेख, अमोल शेलकर

 

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!