अवैध गुटखा कारवाईची बातमी छापणाऱ्या पत्रकाराला मोबाईल वरुन धमकी !  

प्रतिनिधी —

संगमनेर शहरातील तीन ठिकाणांवर छापे टाकून अवैध गुटखा जप्त करण्यात आला. याबाबतची बातमी प्रसिद्ध करणाऱ्या पत्रकार धिरज ठाकुर यांना फोनवरून मेसेज करून गुटखा विक्रेत्याने धमकी दिली असल्याने संबंधित गुटखा डीलरच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित आरोपीवर पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. शुक्रवारी दैनिक प्रवरा तीर मधील ‘संगमनेरी ठोका’ या सदरात सदरचे वृत्त प्रकाशित करण्यात आले. शहरातील इंदिरानगर भागात राहणारा गुटखा विक्रेता  विजय भागवत याचे नाव बातमीत होते.

त्याने पत्रकार धीरज ठाकूर यांना फोनवरून मेसेज पाठवून धमकी दिली होती. तसेच दमदाटी व शिवीगाळही केली होती. ठाकूर यांनी फिर्याद दिल्यानंतर संगमनेर शहर पोलिसांनी विजय भागवत उर्फ बुट्ट्या आणि देवा दाजी पूर्ण नाव माहित नाही यांच्यासह सह दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!