दरोड्याच्या तयारीत असलेले तब्बल ११ सराईत गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेने पकडले !
दरोडा व ATM चोरीचे गुन्हे उघड ; ८ लाख ५३ हजार ८१० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत
प्रतिनिधी —
राहुरी ते अहमदनगर रस्त्यावर शनिशिंगणापूर फाट्यावर दहा ते पंधरा जण दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या ११ सराईत गुन्हेगारांना पकडण्यात आले असून तिघेजण फरार झाले असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेकडून देण्यात आलेली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना गुप्त बातमी मिळाली. याबाबत आहेर यांनी पथकाला कारवाई करण्यासंदर्भात माहिती दिली. शनिशिंगणापुर कडे जाणाऱ्या रोडलगत खात्री करता तेथे टपरीच्या आडोशाला अंधारात काही इसम बसलेले दिसले. व टपरीजवळ २ कार २ मोटार सायकल उभ्या असलेल्या दिसल्या त्या पैकी एका मोटारसायकल जवळ तिन इसम उभे असल्याचे दिसले. सदर ठिकाणी अचानक छापा टाकला असता सावध झालेल्या टोळीतील एका मोटर सायकलवर तिघा जणांनी तेथून पळ काढला. तर पोलिसांनी ११ जणांना ताब्यात घेतले.

१) राहुल किशोर भालेराव (वय २३ वर्षे रा. वडाळा महादेव, श्रीरामपुर, २) संतोष सुखराम मौर्या (वय ५० वर्षे रा. गजल हॉटेलसमोर नेवासा, रोड श्रीरामपुर, मुळ रा. लोथा, जिल्हा फतेहपुर, उत्तरप्रदेश ३) सागर विश्वनाथ पालवे (वय २७ वर्षे रा. गजानन कॉलनी, अहमदनगर, मुळ रा. मेहेकरी, ता. नगर, ३) बबलु उर्फ दानिश शौकत शेख (वय २४ वर्षे रा. वार्ड नं. 01, श्रीरामपुर, ता. श्रीरामपुर, ५) आदिनाथ सुरेश इलग (वय २६ वर्षे रा. मोरे चिंचोरे, ता. नेवासा, ७) रितेश सुरेश दवडे (वय २१ वर्षे रा. सानेगुरुजी वसाहत, कोल्हापुर, ७) दिपक महादेव साळवे (वय ३० वर्षे रा. मोरे चिंचोरे, ता. नेवासा, ८) रमेश भाऊसाहेब वाकडे (वय २३ वर्षे रा. भोकर, ता. श्रीरामपुर, ९) प्रितमसिंह जगदिपसिंह ज्युनी, (वय २३ वर्षे, रा. बालका हायस्कुल जवळ, वार्ड नं.३, श्रीरामपुर, १०) मिलींद मोहन सोनवणे (वय २९ वर्षे, रा. हरेगांव, ता. श्रीरामपुर, ११) अविनाश कारभारी विधाते (वय २७ वर्षे, रा. म्हसोबानगर, घुलेवाडी, संगमनेर, ता. संगमनेर) अशी पकडलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत.
तर दादा खंडु गांगुर्डे, शिवाजी मिठु शिंदे, संतोष शेषराव निकम तिघेही (रा.कात्रड, ता. राहुरी) हे पसार झाले आहेत.

ताब्यात घेतलेल्या संशयीतांची अंगझडती घेता एक गावठी कट्टा, ६ जिवंत काडतुस, तलवार, २ सुरे, चाकू, लोखंडी पाईप, लाकडी दांडके, मिरचीपुड, स्विफ्टकार, अल्टोकार, युनिकॉन मोटार सायकल, १५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, गॅसटाकी, गॅस कटर, ऑक्सिजन सिलेंडर, रोख रक्कम, ९ विविध कंपनीचे मोबाईल फोन असा एकुण ८लाख ५३ हजार ८१० रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आला.

राहुरी पोलीस स्टेशनला 1243/2023 भादविक 399, 402 सह आर्म ऍ़क्ट 3/25 व 4/25 प्रमाणे दरोडा तयारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव, सोपान गोरे, मनोजर शेजवळ, सहायक फौजदार बाळासाहेब मुळीक, पोलीस हवालदार दत्तात्रय गव्हाणे, मनोहर गोसावी, अतुल लोटके, देवेंद्र शेलार, पोलीस नाईक रविंद्र कर्डीले, सचिन अडबल, विशाल दळवी, विजय ठोंबरे, संतोष खैरे, फुरकान शेख, पोलीस शिपाई रणजित जाधव, रोहित मिसाळ, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड, चालक पोलीस हवालदार संभाजी कोतकर, अर्जुन बडे, अरुण मोरे आधी सहभागी झाले होते.

