लग्नासाठी घरच्यांनी शोधलेला मुलगा पसंत नसल्याच्या कारणावरून तरुणीची आत्महत्या ?
प्रतिनिधी —
लग्नासाठी घरच्यांनी निवडलेला मुलगा पसंत नाही, या कारणाने संगमनेर शहरात महाविद्यालयीन तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

ट्वींकल उदय सोनवणे (वय 23, सध्या राहणार नवीन नगर रोड, मूळ राहणार स्वामी विवेकानंद नगर, सिडको, राणे नगर नाशिक) असे मयत मुलीचे नाव आहे.
सदर मुलगी ही संगमनेर येथे वैद्यकीय शिक्षण घेत असल्याची माहिती मिळाली असून या मुलीच्या विवाहा साठी तिच्या घरच्यांनी एक मुलगा पसंत केला होता. परंतु सदर मुलीला तो मुलगा पसंत नसल्याने या तरुणीने थेट आत्महत्या करण्याचे पाऊल उचलले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

उदय तुकाराम सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार पारधी हे करीत आहेत.
