संगमनेर शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घरफोडी करणारे गुन्हेगार पकडले !

घरफोडीच्या गुन्ह्यात एका महिलेचा समावेश

प्रतिनिधी —

संगमनेर शहरात घरफोडी करून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरणारे गुन्हेगार पोलीस उपअधीक्षक आणि संगमनेर शहर पोलीस स्टेशनच्या संयुक्त पथकाने पकडले आहेत. याप्रकरणी एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून त्याला अटक करण्यात आली आहे. तर यात एका महिलेचा देखील समावेश आहे.

इम्रान चांद शेख असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तर त्याच्या महिला साथीदाराचे नाव मिनाज राजू शेख असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

रहेमत नगर परिसरातील इमरान सलीम शेख यांच्या बंद घराचा कडी कोंडा तोडून घरातील सुमारे पाच तोळे सोन्याचे दागिने सदर आरोपीने चोरून नेल्याचे उघडकीस आले आहे.

पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळाली की, इम्रान चांद शेख (वय २९) मूळ राहणार एकता नगर, संगमनेर, हल्ली राहणार गल्ली नंबर १ रमजान पुरा, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक याने चोरी केली असल्याची माहिती मिळाली.

त्यानुसार शहर पोलिसांच्या आणि पोलीस उपअधीक्षक कार्यालयाच्या संयुक्त पथकाने या शोध घेऊन इम्रान शेख व त्याच्या एका अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले व चौकशी केली असता इमरान आणि त्याची महिला साथीदार मिनाज शेख या दोघांनी मिळून हा गुन्हा केला असल्याची माहिती समोर आली.

इम्रान चांद शेख व महिला साथीदार या दोघांनी हा गुन्हा केला असल्याचे तपासात उघड झाले आहे. इम्रान शेख याला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे. अधिक चौकशीत त्याने संगमनेर शहरात अजून तीन ठिकाणी चोरी केल्याचे उघडकीस आले आहे.

पोलीस उप अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भगवान मथुरे तसेच पथकातील पोलीस नाईक राहुल डोके, राहुल सारबंदे, रावसाहेब लोखंडे, भागा धिंदळे, अजित कुऱ्हे, आत्माराम पवार, सचिन धनाड, आकाश बहिरट या पथकाने ही कारवाई केली असून पुढील तपास संगमनेर शहर पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार रावसाहेब लोखंडे हे करत आहेत.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!