सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखाना साखर वाटप ३० ऑक्टोबर पासून

प्रतिनिधी —

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांचे हे जन्मशताब्दी वर्ष असून या निमित्त तालुक्यासह सहकार क्षेत्रात सहकार, कृषी व शैक्षणिक क्रांतीचा उत्सव साजरा होत असून दरवर्षी प्रमाणे थोरात सह.साखर कारखान्याच्या सभासदांना दिपावली निमित्त १५ किलो साखर मोफत वाटप करण्यात येणार आहे. सोमवार दि. ३० ऑक्टोबर २०२३ ते शनिवार दि. ४ नोव्हेंबर २०२३ या काळात कारखाना कार्यस्थळावर साखर वाटप केली जाणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ यांनी दिली आहे.

दिपावली निमित्त यावर्षी ही सभासदांना १५ किलो साखरेचे वाटप केले जाणार आहे. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सह.साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने दि.३०/०९/२०२३ अखेर मंजुर प्रतिशेअर्सला १५ किलो साखर देण्याचे ठरविले आहे. ज्या सभासदांना कारखान्याने ओळखपत्र दिलेले आहे. त्यांनी सदर ओळखपत्र सोबत आणावे. त्यांना ओळखपत्राचे नोंदणीवर साखर देण्यात  येईल. सभासद ओळखपत्राच्या झेरॉक्स प्रतीवर साखर दिली जाणार नाही.

कारखान्याने दिलेले ओरीजनल ओळखपत्र आणणे आवश्यक आहे. जे सभासद ओळखपत्र घेऊन येणार नाहीत. अशा सभासदांना सभासद ओळखपत्र असल्याशिवाय साखर दिली जाणार नाही. जे सभासद बाहेरगावी राहतात व त्यांचे ओळखपत्र तयार झालेले नाही अशा सभासदांनी साखर घेणेसाठी येताना एक फोटो व आधारकार्ड कॉम्प्युटर विभागाकडे जमा केल्याशिवाय साखर मिळणार नाही. स्वत: येऊ न शकणाऱ्या सभासदांनी सभासदाचा फोटो,आधारकार्ड व सोसायटी किंवा ग्रांमपंचायत यांचे सही व शिक्का असलेले अधिकारपत्र देवून दिलेल्या वेळेत साखर घ्यावयाची आहे. मयत सभासदांच्या साखरेसाठी छापील अर्ज त्या त्या गावच्या सेवासोसायट्यांमध्ये उपलब्ध आहे. सकाळी ९ ते सायं. ५ या वेळेत कारखान्याच्या गोडाऊन क्रमांक १३ मध्ये साखर वाटपाचे नियोजन करण्यात आले आहे.

तरी सर्व सभासद बंधू भगिनींनी साखर वाटप कार्यक्रमाप्रमाणेच साखर घेऊन जावी व साखर वाटपाबाबद सहकार्य करावे. असे आवाहन कारखान्याचे व्हा.चेअमरन संतोष हासे, संचालक मंडळ व कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!