लांड्या मराठीत बोल असा दम भरीत एकाला जबर मारहाण !

संगमनेर तालुक्यातील घटना

प्रतिनिधी —

हिंदी बोलणाऱ्या संगमनेरच्या एका व्यक्तीला ‘लांड्या मराठीतून बोल’ असा दम भरीत बेदम मारहाण करण्याची घटना संगमनेर तालुक्यातील पठार भागात घडली आहे. घारगाव पोलिसांनी या प्रकरणी एक ज्ञात आणि सात ते आठ अनोळखी इसमां विरुद्ध गुन्हा दाखल केला.

यापैकी गुन्हा दाखल झालेला आरोपी नितीन खेमनर याची ओळख पटली असून इतर सात ते आठ अज्ञात इसमांचा पोलीस शोध घेत आहेत.

या संदर्भात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, समीर चांद शेख (वय ४३, धंदा ड्रायव्हर, रा. कुरण रोड, विजयनगर, संगमनेर) हे आपल्या ताब्यातील वाहन आयशर कंपनीची गाडी (एमएच १२ एफ झेड ७३७०) मधून सिमेंटच्या शंभर गोण्या घेऊन शिंदोडी येथे देण्यासाठी गेले होते. त्यांच्यासोबत कंपनीचे हमाल विशाल पानसरे हे देखील होते.

सिमेंट गोण्या दिल्यानंतर शेख हे मांडवा फाट्यावर चहापाणी घेऊन संगमनेर कडे निघाले असताना हवालदार वस्तीच्या मागे गाडीच्या समोर एक दुचाकी चाललेली होती. त्या गाडीला ओव्हरटेक करून पुढे गेले असता समोरून मोटार सायकलवर दोन इसम आले व त्यांनी त्यांच्याकडील मोटरसायकल रस्त्याच्या मधोमध उभी केली आणि शेख यांची गाडी थांबवली.

त्या मोटरसायकल वरील दोन इसमांनी खाली उतरून शिवीगाळ करून तुझी साईड कोणती आमची साईड कोणती असे म्हणून गाडीतून खाली ओढून शिवीगाळ करून मारहाण सुरू केली आणि म्हणाले की, ‘लांड्या मराठीत बोल’ पण हिंदीत बोलल्यामुळे झटापटी होऊन त्यांनी शेख यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.

त्यानंतर त्या ठिकाणाहून ते संगमनेरच्या दिशेने निघाले असता चिंचेवाडीच्या पुढील वस्ती जवळून जात असताना गाडीच्या मागून चार ते पाच मोटार सायकलवर सात ते आठ इसम आले व त्यातील एकाने गाडी थांबवण्यास सांगितले. गाडी थांबवली असता ज्या इसमाने गाडी थांबवण्यासाठी सांगितले होते त्यानेच गाडीवर दगड फेकून मारला त्यामुळे गाडीची काच फुटली व तो दगड शेख यांच्या डोक्याला लागून ते जखमी झाले.

नंतर बाकीच्या इतर लोकांनी गाडीतून खाली खेचून लाथा बुक्क्यांनी मारहाण करत असताना शेख हे जवळच असलेल्या दुकानाच्या आसऱ्याला जात असताना त्या दुकानावर असलेल्या खुर्चीने एकाने मारहाण करून जखमी केले. शिवीगाळ करून व मारहाण करून ते निघून गेले. त्यानंतर शेख संगमनेर येथे आले आणि खाजगी रुग्णालयात उपचार घेतले. उपचार घेत असताना मारहाण करणाऱ्या मधल्या एकाचे नाव समजले असून तो नितीन खेमनर असल्याचे माहीत झाले. त्यावरून नितीन खेमनर आणि इतर सात ते आठ जणांविरुद्ध माझी फिर्याद आहे. अशी वरील फिर्याद शेख यांनी दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!