नवऱ्याची दारू सोडायची असेल तर प्रवरा नदीत फेऱ्या मारा ; अंधश्रद्धेचा फायदा घेत महिलेवर केला बलात्कार !

विजयादशमीच्या दिवशी संगमनेरातील घटना 

प्रतिनिधी —

दारूचे व्यसन हा समाजामधील सर्वात मोठा कलंक आहे. पुरुषांनी या व्यसनापाई अनेक महिलांचे संसार उध्वस्त केले आहेत. नवऱ्याला दारूच्या व्यसनापासून सोडवण्यासाठी कुटुंबीय आणि पत्नी देखील खूप प्रयत्न करते. अशाच एका पत्नीने नवऱ्याची दारू सोडावी म्हणून एकाकडे उपाय मागितला तर त्याने त्याच्या असाहाय्यतेचा गैरफायदा घेत तिच्यावर बलात्कार करून पळ काढला.

संगमनेर मध्ये प्रवरा नदी पात्रात ही घटना घडली असून शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. एका महिलेच्या पतीचे दारू व्यसन सुटत नव्हते म्हणून ‘तुझ्या नवऱ्याची दारू सोडायची असेल तर प्रवरा नदीपात्रात फेरी मारवी लागेल’ असे त्या महिलेला पटवून देऊन आरोपी तिच्यासोबत नदीपात्रात गेला.

नदी पात्रात गेल्यानंतर सदर आरोपीने पीडित महिलेस कपडे काढण्यास सांगितले. महिलेने अंगावरील साडी काढली. त्यावेळी आरोपीने लिंबू आणि नारळ हे नदीपात्रात जमिनीवर ठेवून त्याला फेरी मारण्यास सांगितले. लिंबू आणि नारळाला फेरी मारत असतानाच आरोपीने आजूबाजूला कोणी नाही याचा गैरफायदा घेत बळजबरीने अत्याचार करीत बलात्कार करून पळून गेल्याची घटना घडली आहे.

दसऱ्याच्या दिवशीच ही घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. महिलेवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचे नाव पप्पू आव्हाड असे असून तो संगमनेर तालुक्यातील रहिवासी आहे. सध्या तो पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!