हेरंब कुलकर्णी यांना मारहाण करणारे गुंड जेरबंद ; तिघांना ताब्यात घेतले, दोघेजण फरार

स्थानिक गुन्हे शाखा नगर व तोफखाना पोलिस पथकाची संयुक्त कारवाई

प्रतिनिधी —

हेरंब कुलकर्णी यांना मारहाण करणारे आरोपी स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर व तोफखाना पोलीस स्टेशनच्या संयुक्त पथकाने जेरबंद केले आहे. या घटनेत एकूण पाच आरोपी निष्पन्न झाले असून त्यामध्ये एक विधी संघर्षीत बालक आहे. या बालकासह तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून दोघेजण फरार झाले असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेकडून देण्यात आली आहे.

सामाजिक कार्यकर्ते व मुख्याध्यापक हेरंब रामचंद्र कुलकर्णी (रा. बालाजी चेंबर्स, श्रमीकनगर, सावेडी, अहमदनगर) हे व त्यांचे मित्र मोटारसायकलवरुन जात असतांना तीन अनोळखी इसमांनी मोटारसायकलवर येवून त्यांची मोटारसायकल अडवून कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्याला लोखंडी रॉडने जबर मारहाण करुन जखमी केले होते.

तोफखाना पोलीस ठाणे गु.र.नं. १४७४/२०२३ भादवि कलम ३०७, ३२४, ३४१, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

सदर गुन्हयाचे गांभिर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखा आणि तोफखाना पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने  अहमदनगर शहरातील गुन्हा घडल्याचे ठिकाणचे तसेच, निलक्रांती चौक, पत्रकार चौक, प्रेमदान चौक, प्रेमदान हाडको, जोशी क्लासेस येथील सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज प्राप्त करुन सदर फुटेजच्या आधारे तसेच तांत्रिक विश्लेषणाचे आधारे तपास केला.

सदरचा गुन्हा हा चैतन्य सुनिल सुडके (रा. सुडकेमळा, अहमदनगर) याने व त्याचे इतर साथीदारांनी केला असल्याने निष्पन्न झाल्याने त्यास ताब्यात घेवून त्यास अधिक विश्वासात घेवून त्याचेकडे गुन्ह्याबाबत विचारपूस करता त्याने सांगितले की, त्याचा मित्र अक्षय विष्णु सब्बन याची सिताराम सारडा विद्यालयाजवळ पानटपरी असुन सदर पानटपरी ही अतिक्रमणामध्ये येत असल्याने हेरंब रामचंद्र कुलकर्णी यांनी पानटपरी काढणेबाबत महानगरपालीका येथे अर्ज दिल्याने सदर पानटपरी काढण्यात आलेली होती.

त्याचा राग मनात धरुन १) अक्षय विष्णु सब्बन याचे सांगणेवरुन २) चैतन्य सुनिल सुडके (रा.सुडकेमळा, अहमदनगर) ३) अक्षय पुर्ण नांव माहित नाही, ४) सनि जगधने, ५) एक विधीसंघर्षीत बालक अशांनी मिळून हा हल्ला होणार केली असल्याचे सांगितल्याने सदर इसमांचा शोध घेतला असता १) अक्षय विष्णु सब्बन (दातरंगे मळा, विटभट्टीजवळ, ता. जि.अहमदनगर) २) चैतन्य सुनिल सुडके (सुडकेमळा, अहमदनगर) ३) एक विधीसंघर्षीत बालक असे पकडण्याचा आले असून अक्षय पुर्ण नांव माहित नाही (फरार) ५) सनि जगधने पुर्ण नांव पत्ता माहित नाही (फरार) यांचा शोध घेण्यात येत आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!