संगमनेरात पुन्हा घरफोडी ! चोरट्यांचा धुमाकूळ !

१ लाख ८३ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरले

प्रतिनिधी —

संगमनेर शहरात चोऱ्या आणि घरफोड्यांचे सत्र सुरूच असून चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. या चोरट्यांना पकडण्यात पोलीस सपशेल अपयशी ठरले असून घरफोड्या आणि चोऱ्यांच्या गुन्ह्यांचे प्रमाण वाढते आहे.

संगमनेर शहरातील उपनगरात चोरट्यांनी धाडसी घरफोडी करून १ लाख ८३ हजार रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी करून पसार झाले आहेत. पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. शहरातील रहेमत नगर भागात आकार कॉलनी, वार्ड क्रमांक चार या ठिकाणी ही घरफोडी झाली आहे.

इमरान सलीम शेख (वय ३८, राहणार रहेमत नगर, आकार कॉलनी, वार्ड क्रमांक चार, संगमनेर) यांनी यासंदर्भात अज्ञात चोरट्या विरुद्ध फिर्याद दिली आहे.

३ सप्टेंबर रोजीच्या मध्यरात्रीच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी फिर्यादीच्या घरात बेडरूमला लावलेल्या दरवाजाचे कुलूप कशाने तरी तोडून बेडरूम मध्ये प्रवेश केला आणि फिर्यादीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. अशी तक्रार पोलीस ठाण्यात करण्यात आली असून शहर पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. सहाय्यक फौजदार लोखंडे हे पुढील तपास करीत आहेत.

 

 

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!