संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथे घरफोडी !

सोने चांदीचे दागिने लंपास

प्रतिनिधी —

संगमनेर तालुक्यातील वडगाव पान या गावात घरफोडी झाली असून अज्ञात चोरटे सोन्या चांदीच्या दागिन्यांची चोरी करून पसार झाले आहेत. अमोल सुभाष मोरे यांनी यासंदर्भात फिर्याद दिली असून संगमनेर तालुका पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

वडगाव पान येथील घराच्या प्रवेशद्वाराचे सेफ्टी डोअर व आतील लाकडी दरवाजाचा कडी कोयंडा तोडून त्या वाटे घरात प्रवेश करून घरातील लोखंडी कपाटातील तिजोरीत असलेल्या आणि देवघरातील लोखंडी पेटीत असलेल्या सोन्याच्या दागिन्यांची अज्ञात चोरट्यांनी चोरी केली असल्याची फिर्याद मोरे यांनी दिली आहे.

यामध्ये चोरट्यांनी सोन्याचे गंठण, ठुशी, कानातले आणि सोन्याची मोहन माळ असा जुन्या बाजारभावाने ७६ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. अमोल मोरे हे सध्या खाजगी नोकरी निमित्त सिन्नर येथे राहत आहेत. मात्र ते वडगाव पान तालुका संगमनेर येथील मूळ रहिवासी आहेत. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!