मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक

शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा MUST (मस्ट) प्रणित ‘परिवर्तन पॅनल’ ला जाहीर पाठिंबा !

निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे 

संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —

मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत आता लोकप्रतिनिधींनी देखील प्रत्यक्ष अप्रत्यक्ष भाग घायला सुरवात केली आहे. कोकण शिक्षक मतदार संघाचे विधानपरिषद सदस्य आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी MUST प्रणित परिवर्तन पॅनल ला जाहीर पाठिंबा दिला आहे.

आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी जाहीर पाठिंब्याचे पत्र मस्ट संघटनेचे अध्यक्ष डॉ. विजय पवार यांना सुपूर्द केले. या लेखी पत्रात आमदार म्हात्रे यांनी म्हटले आहे की, ” MUST संघटनेचे अध्यक्ष डॉ. विजय पवार यांनी माझ्याकडे शिक्षकांचे अनेक प्रश्न मांडले.व्यक्तीशः पाठपुरावा केला. शिक्षकांच्या अनेक वैयक्तिक समस्या मांडल्या.त्या सर्व समस्या आपण शासन दरबारी पाठपुरावा करून सोडविल्या. तसेच शिक्षण मंत्रीमहोदयांकडे मांडल्या. येत्या ५ जुलै रोजी होणाऱ्या मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत आपण MUST प्रणित परिवर्तन पॅनल ला जाहीर पाठिंबा देत आहे.” तरी सर्व शिक्षक -प्राध्यापकांनी MUST प्रणित परिवर्तन पॅनल ला भरघोस मतांनी निवडून द्यावे असे आवाहन कोकण विभाग शिक्षक आमदार म्हात्रे यांनी केले आहे.

परिवर्तन पॅनल ला आमदार म्हात्रे यांनी पाठिंबा दिल्यामुळे कोकण विभागात या निवडणुकीत अधिक चुरस निर्माण झाली आहे. आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी अलीकडेच कोकण विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूक मोठ्या मताधिक्याने जिंकली आहे. आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी मानणारा मोठा वर्ग कोकण विभागात असल्याने सध्या तरी MUST प्रणित परिवर्तन पॅनल चे पारडे जड झाल्याचे दिसते . आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी जाहीर पाठिंबा दिल्याने मोठया प्रमाणावर प्राध्यापक शिक्षकांची मते परिवर्तन पॅनल कडे वळण्याची मोठी शक्यता आहे. ठाणे पालघर, रायगड, रत्नागिरी सिधुदुर्ग येथील प्रत्येक तालुक्यात आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा दांडगा जनसंपर्क आहे. या जनसंपर्काच्या जोरावर आणि संघटनेच्या कामाच्या बळावर परिवर्तन पॅनल निवडणुकीत जोरदार मुसंडी मारेल अशी परिस्थिती आहे.

आमदार म्हात्रे यांच्या पाठिंब्या मुळे शिक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे. या पाठिंब्याचे रूपांतर मतांमध्ये कशा प्रकारे होते याची उत्सुकता कार्यकर्त्यांमध्ये सुरू झाली आहे. आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी परिवर्तन पॅनलला पाठिंबा दिल्याने संघटनेचे अध्यक्ष डॉ विजय पवार, सचिव डॉ. निर्मला पवार, उपाध्यक्ष प्रा. शशिकांत माघाडे आणि कार्यकारी समितीचे पदाधिकारी उपाध्यक्ष डॉ. अजय कांबळे, खजिनदार संदेश डोंगरे, डॉ विजय हिले डॉ फ्रॅन्सिस वैद्य, डॉ. मुनिष पांडे, डॉ दीपक गायकवाड, प्रा. अब्दुल चौधरी, प्रा, एन.के. पाटील, डॉ दिलीप काळूसे, डॉ दिगंबर सपकाळ, डॉ.आनंद आंबेकर, डॉ. बबन रिंढे, डॉ. अभय वायाळ यांनी आभार मानले आहेत.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!