सावरगाव घुले येथे सावित्रीबाई फुले अभ्यासिकेची सुरुवात !

प्रतिनिधी —

सावरगाव येथील तरुणांनी एकत्र येऊन गावातील विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी अभ्यासिका, ग्रंथालय सुरू केले. या अभ्यसिकेचे उदघाटन माजी आमदार सुधीर तांबे, दुर्गाताई तांबे, जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे, शिक्षण विस्तार अधिकारी सुरेखा फटांगरे, कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी सरपंच तान्हाजी घुले, रेवजी घुले, अर्जुन घुले, शारदा विद्यालयाचे मुख्याध्यापक कोटकर सर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

या कार्यक्रमात बोलताना डॉ. सुधीर तांबे म्हणाले की, ग्रामस्थांनी एकत्र येऊन गावातील मुलांच्या शिक्षणासाठी प्रयत्न केले पाहिजेत. मुलांनी पुस्तके वाचली पाहिजेत. अभ्यास मंडळ चालवली गेली पाहिजेत. तरुण मुलांनी एकत्र येऊन गावातील प्रश्न सोडवायचे असेल तर सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे.

गावातील तरुण दारूच्या आहारी जात आहेत. व्यसनापासून दूर राहण्यासाठी तरुणांनी प्रयत्न केले पाहिजे. ग्रामीण भागातील मुलांनाही चांगले शिक्षण मिळाले पाहिजे या साठी प्रयत्न केला पाहिजे असे मत दुर्गाताई तांबे यांनी व्यक्त केले.

ही अभ्यासिका तयार करण्यासाठी गावातील छात्रभारतीचे अनिकेत घुले, शिवशक्ती तरुण मित्र मंडळ कार्यकर्ते अक्षय घुले, ऋषिकेश घुले,आशिष घुले, दीपक खरात, सोहम घुले, विनोद खरात, ऋषिकेश वाकचौरे, श्रमिक घुले, शुभम गायकवाड, प्रसाद बोऱ्हाडे, किशोर बोऱ्हाडे, श्रुती घुले, निलेश मदने, ऋषि माधव घुले, ईश्वर घुले, धनु घुले, आदित्य घुले, गिरीश घुले, वंदना राऊत आदींनी सहकार्य केले. कार्यक्रमासाठी गावातील शिक्षक विद्यार्थी ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते .

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!