अवैध देशी व विदेशी दारु अड्ड्यावर राजूर पोलिसांचा छापा 

७० हजाराचा मुद्देमाल जप्त

प्रतिनिधी —

अकोले तालुक्यातील केळुंगण येथे देशी-विदेशी दारुचा साठा करून अवैधरित्या दारूची विक्री केली जात असल्याची माहिती राजूर पोलिसांना समजल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली राजूर पोलिसांनी छापा घालून देशी-विदेशी दारू पकडली आहे.

नवनाथ सुरेश देशमुख यास पोलिसांनी पकडले असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

आज सायंकाळी गुप्त बातमी दारामार्फत पोलिसांना खबर मिळाली की, केळुंगण गावात नवनाथ सुरेश देशमुख हा चोरुन देशी व विदेशी दारुची विक्री करत आहे.

राजुर पोलिसांच्या पथकाने नवनाथ सुरेश देशमुख याच्या घराजवळ छापा टाकला असता पत्र्याच्या शेडजवळ झडती घेतली असता त्या ठिकाणी देशी व विदेशी दारूचा मोठा साठा आढळून आला. हे सर्व दारूचे खोके पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.

सदर ठिकाणी खालील प्रमाणे देशी व विदेशी दारुचा मुद्देमाल मिळून आला

 

1) 2560/-रु.किमतीच्या मॅकडॉल नं.1 कंपनीच्या 16 बाटल्या प्रत्येकी 180 मिली प्रत्येकी 160/-रु दराने

2) 3600/-रु. किमतीच्या ऑफीसर चॉईस कंपनीच्या 24 बाटल्या प्रत्येकी 180 मिली, प्रत्येकी 150/-रु दराने

3) 3900/-रु. किमतीच्या इंपेरीयल ब्ल्यु कंपनीच्या 26 बाटल्या प्रत्येकी 180 मिली, प्रत्येकी 150/-रु दराने

4) 51840/-रु. किमतीच्या बॉबी संत्रा कंपनीच्या 864 बाटल्या प्रत्येकी 180 मिली, प्रत्येकी 60/-रु दराने

5) 2560/-रु. किमतीच्या बॉबी संत्रा कंपणीच्या 239 बाटल्या प्रत्येकी 90 मिली प्रत्येकी 30/-रु. दराने

एकुण-69070/- रु.

हा मुद्देमाल जप्त करुन पोलीस नवनाथ सुरेश देशमुख (रा. केळुगण, ता. अकोले) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस शिपाई गाढे यांनी फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलीस नाईक भडकवाड करित आहेत. अवैध दारु विक्री करणारे व्यक्ती, ठिकाणे माहीती असल्यास राजुर पोलीस स्टेशनशी संपर्क करावा आपले नाव गुप्त ठेवण्यात येईल. असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!