पतीचा छळ असह्य झाल्याने विवाहितेची आत्महत्या
माहेरहून २ लाख रुपये घेऊन ये… नाहीतर दुसरीशी लग्न करतो असे धमकावणारा पती गजाआड
प्रतिनिधी —
आई वडिलांकडून दोन लाख रूपये घेऊन ये तरच तुला नांदविन…पैसे दिले नाही तर घरातून हाकलून देईन व दुसरीशी लग्ण करेल अशी धमकी देवून वेळोवेळी मानसिक व शारीरिक छळ करुन पत्नीस आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी पती बाळासाहेब विष्णू वाकचाैरे (रुंभोडी, ता. अकोले) याच्या विरूद्ध अकोले पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

अकोले तालुक्यातील रुंभोडी येथील शितल बाळासाहेब वाकचाैरे या ३५ वर्षिय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्या प्रकरणी अकस्मात मृत्यू ची नोंद करून गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्यानंतर निर्मला हरिश्चंद्र रोकडे (रा.अण्णाभाऊ साठे नगर, वाबळे इस्टेट, ठाणे) यांनी अकोले पोलिसांत फिर्याद दिली असुन त्यात म्हटले आहे कि, दि. ०१ /०५/२०१० ते ०३/०६/२०२२ पर्यत फिर्यादीची मुलगी शितल बाळासाहेब वाकचाैरे तिच्या सासरी राहते घरी नांदत असताना पती बाळासाहेब विष्णू वाकचाैरे याने तुझ्या आई वडिलांकडून दोन लाख रुपये घेऊन ये तरच मी तुला नांदविन, पैसे नाही आणले तर तुला घरातून हाकलून देईल असे म्हणून वेळोवेळी तिला मारहाण व शिवीगाळ करत असे. तसेच पैसे नाही आणले तर मी दुसऱ्या महीले बरोबर लग्ण करेन अशी धमकी देवून तिचा मानसिक व शारीरिक छळ करुन तिला आत्महत्त्या करण्यास केले असल्याची फिर्याद दिली आहे.

त्यानुसार मयत विवाहितेच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आले आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे हे करत आहेत.
