मोबाईल शॉपी फोडणारा आरोपी पाच तासांत जेरबंद !

राजूर पोलिसांची कामगिरी

 

प्रतिनिधी —

 

मोबाईल शॉपी फोडून चोरी करणाऱ्या गुन्हेगारास अवघ्या पाच तासात राजूर पोलिसांनी मुद्देमालासह जेरबंद केले आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, राजुर गावात असणारे अपना मोबाईल शॉपी दुकान रात्री कोणीतरी अज्ञात इसमाने फोडून दुकानातील २९ हजार रुपये किमतीचा माल चोरून नेला होता.

यासंदर्भात दुकान मालक तोफिक आयुब तांबोळी रा. ओमनगर, राजूर यांनी फिर्याद दिली होती. सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे तसेच पोलीस कर्मचारी करीत असताना तांत्रिक तपासणीच्या आधारे सदरचा गुन्हा विजय बाळू शिंदे (रा. चंदनवाडी, राजूर ता. अकोले) यांने केली असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांनी आरोपी शिंदे याला ताब्यात घेतले असता त्याच्याकडून चौकशी केली असता त्याने चोरी केल्याचे निष्पन्न झाले.

त्यामुळे त्याच्याकडून वीस हजार रुपये किमतीचा विवो कंपनीचा मोबाइल व ९ हजार रुपये किमतीची मोबाईल ॲक्सेसरीज असे साहित्य ताब्यात घेण्यात आले आहे.

याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. पुढील तपास पोलीस नाईक रोहिणी वाडेकर करत आहेत.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!