गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ५५ जणांना प्रवेशबंदी

२३ ते २६ सप्टेंबरदरम्यान संबंधित पोलीस ठाणे हद्दीत व संगमनेर-अकोले तालुका स्थळसीमा हद्दीत प्रवेशास मनाई 

संगमनेर प्रतिनिधी –

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, तसेच सार्वजनिक शांतता व जनतेला त्रास होऊ नये यासाठी संगमनेर उपविभाग पोलिसांनी विविध गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ मधील कलम १६३ अन्वये संगमनेर उपविभागातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील एकूण ५५ जणांना प्रवेशबंदीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. 

संबंधित व्यक्तींवर यापूर्वी विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल असून, त्यांच्याकडून पुन्हा बेकायदेशीर कृत्ये होऊ नयेत आणि गणेशोत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था कायम राहावी, या उद्देशाने ही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

दि. २३ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १२ वाजल्यापासून ते दि. २६ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत संबंधित पोलीस ठाण्यांच्या हद्दीत तसेच संगमनेर व अकोले तालुक्यांच्या स्थळसीमा हद्दीत प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. हे आदेश अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर यांच्यामार्फत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ अन्वये पारित करण्यात आले आहेत. 

संगमनेर शहर पोलीस स्टेशन — १६ जण

१. राहुल प्रकाश धोत्रे, वय २० वर्षे, रा. संजय गांधी नगर, ता. संगमनेर

२. कृष्णा हरीचंद्र गायकवाड, वय २० वर्षे, रा. संजय गांधी नगर, ता. संगमनेर

३. दत्ता राजू म्हस्के, वय २२ वर्षे, रा. पिंपळ स्टेशन, ता. संगमनेर

४. यश संजय शेटे, वय १९ वर्षे, रा. सौभाग्य मंगल कार्यालय

५. महेश राजू म्हस्के, वय १९ वर्षे, रा. पिंपळ स्टेशन, संगमनेर

६. रोहित विष्णू पिलगर, वय २० वर्षे, रा. आंबेडकर नगर, संगमनेर

७. भगवान उर्फ अतुल रतन लहामगे, वय ३० वर्षे, रा. उपासने गल्ली, ता. संगमनेर

८. आदित्य शितलकुमार कानकाटे, वय २० वर्षे, रा. नेहरू चौक, ता. संगमनेर

९. अर्धव दुंगेश राजपू, वय २० वर्षे, रा. नेहरू चौक, ता. संगमनेर

१०. अवधूत वसंत जोशी, वय २२ वर्षे, रा. नेहरू चौक, ता. संगमनेर

११. अभ्यांक शौकत शेख, वय २२ वर्षे, रा. अकोले नाका, संगमनेर

१२. लखन मारुती शिंदे, रा. शिवाजीनगर, संगमनेर

१३. कमरअली गुलामजिलानी सौदागर, रा. भारतनगर, संगमनेर

१४. गोविंद रामराव नागरे, वय ३७ वर्षे, रा. नेहरू चौक, संगमनेर

१५. सुर्यांत नानालाल पर्वत, रा. निंबाळे, ता. संगमनेर

१६. सागर चंदू पवार, वय ३२ वर्षे, रा. धुळवाडी, ता. संगमनेर. 

संगमनेर तालुका पोलीस स्टेशन — १२ जण

१. अनसार अब्दुल शेख, रा. हिवरगाव पावसा, ता. संगमनेर

२. पवन विलास वडे, रा. पिंपरणे, ता. संगमनेर

३. साहेबराव भिकाजी राहणे, रा. पिंपरणे, ता. संगमनेर

४. राहुल सुरेश निळे, रा. पिंपळगाव कोंडिरा, ता. संगमनेर

५. अमोल बाळासाहेब शिंदे, रा. मढेवण, ता. संगमनेर

६. अर्जुन अण्णा शिंदे, रा. नानज दुमाला, ता. संगमनेर

७. नागेश रामनाथ चंदमारे, रा. निळामळ खुर्द, ता. संगमनेर

८. रोहिदास धोंडिबा निळे, रा. नांदुरी दुमाला, ता. संगमनेर

९. संतोष रेवजी शेलार, रा. कोकणगाव, ता. संगमनेर

१०. बबन धोंडिबा तारे, रा. लोहारे, ता. संगमनेर

११. सुभाष विठ्ठल लांडगे, रा. वडगाव लांडगा, ता. संगमनेर

१२. सतीश काशिनाथ खेमनर, रा. डिसर, ता. संगमनेर. 

अकोले पोलीस स्टेशन — १२ जण

१. अक्षय मारुती वाकचौरे, वय २५ वर्षे, रा. राखतपूर, ता. अकोले

२. रोहिदास भाऊसाहेब उगडे, वय ३८ वर्षे, रा. म्हाळादेवी (ठाकरवाडी), ता. अकोले

३. कचरू किसन बेंडके, वय ४५ वर्षे, रा. खिरविरे, ता. अकोले

४. रामदास संतू मोहिते, वय ४५ वर्षे, रा. देवठाण, ता. अकोले

५. सिद्धार्थ रमेश चिखणे, वय ३१ वर्षे, रा. डोंगरगाव, ता. अकोले

६. उत्तम आनंदा शिंदे, वय ३४ वर्षे, रा. ब्राह्मणवाडा, ता. अकोले

७. अनिल बाबू फुले, वय ५५ वर्षे, रा. ब्राह्मणवाडा, ता. अकोले

८. नंदलाल प्रभाकर गोडसे, वय ५० वर्षे, रा. लोहळीत बु., ता. अकोले

९. शांताराम नानू पवार, वय ५० वर्षे, रा. लिंगदेव, ता. अकोले

१०. दौलत साहेबराव महाले, वय ३४ वर्षे, रा. बेलापूर, ता. अकोले

११. राजेश बबन शिंदे, वय ३९ वर्षे, रा. शहानूर, अकोले

१२. ओम प्रकाश आवारी, वय २३ वर्षे, रा. सिडकाँप, अकोले. 

राजूर पोलीस स्टेशन — १३ जण

१. विक्रम अशोक घाडकर, रा. राजूर, ता. अकोले

२. आकाश दिलीप पाबळकर, रा. राजूर, ता. अकोले

३. नवनाथ सुरेश देशमुख, रा. कळसूबा, ता. अकोले

४. सुनील लक्ष्मण देशमुख, रा. कळसूबा, ता. अकोले

५. किसन सुरेश चौधरी, रा. राजूर, ता. अकोले

६. रोहिदास पुना वाडे, रा. उंबरे, ता. अकोले

७. भगवान रामचंद्र मुरडक, रा. रंधा, ता. अकोले

८. गणेशनाथ अशोक अवसरकर, रा. वाघुशे, ता. अकोले

९. संतोष हिरामण धाने, रा. वाघुशे, ता. अकोले

१०. किसन सना वाडे, रा. उंबरे, ता. अकोले

११. अरुण पांडुरंग साळवे, रा. आंबित, ता. अकोले

१२. काळू विठ्ठल भांगरे, रा. मन्हारी, ता. अकोले

१३. बंडू भाऊ भांगरे, रा. एकदरा, ता. अकोले. 

घारगाव पोलीस स्टेशन — ९ जण

१. अशोक भिमाजी घुंगड, वय ४३ वर्षे, रा. मांडवे बु., ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर

२. जालिंदर भगताजी डोलनर, वय ४१ वर्षे, रा. डोलनर वस्ती, मांडवे बु., ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर

३. सुनील रामजी वाचकर, वय २८ वर्षे, रा. मांडवे बु., ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर

४. बाळू रामभाऊ केदार, वय ४२ वर्षे, रा. खरडी फाटा, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर

५. जीवन गोरखनाथ खिलारी, वय ४२ वर्षे, रा. साकूर, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर

६. भारत भाऊसाहेब आगलावे, वय ३६ वर्षे, रा. डोळासने, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर

७. सुभाष शांताराम धुले, वय ४२ वर्षे, रा. जांभूत बु., ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर

८. धिरज शिवाजी मतकर, वय २८ वर्षे, रा. वाकणवाडी बाई, जि. सातारा, हद्दी रा. आम साई कृपा दूधघर ढाबा, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर

९. प्रविण लक्ष्मण इंगळे, वय २५ वर्षे, रा. उदापूर, ता. जुन्नर, जि. पुणे, ह.रा. साकूर, ता. संगमनेर. 

आश्वी पोलीस स्टेशन — ५ जण

१. प्रदीप भाऊसाहेब सातपुते, वय ३६ वर्षे, रा. पिंपळगाव अंजनपूर, ता. संगमनेर

२. सामान्य रघुनाथ वपे, रा. वरवंडी, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर

३. बाबासाहेब रावसाहेब वाघमारे, रा. खळी, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर

४. भास्कर पांडुरंग पाड, रा. खांबे, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर

५. अनिल संपत कोरगणे, रा. कांगावाडी, खळी, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर. 

गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईचा बडगा उगारला असून, संबंधित ५५ व्यक्तींना निश्चित कालावधीसाठी प्रवेशबंदी करण्यात आली आहे.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!