संगमनेर उपविभागातील सात जणांवर हद्दपारीची कारवाई ; आणखी २५ जणांचे प्रस्ताव सादर करण्याचे आदेश

संगमनेर प्रतिनिधी –

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी संगमनेर उपविभागातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे. महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील कलम ५६(१)(अ)(ब) अन्वये सात जणांना जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश करण्यास मनाई करणारे हद्दपारीचे आदेश पारित करण्यात आले आहेत. तसेच संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आणखी २५ रेकॉर्डवरील आरोपींचे हद्दपारी प्रस्ताव नव्याने सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

संगमनेर उपविभागातील पोलीस ठाण्यांमध्ये दाखल गुन्ह्यांतील आरोपींच्या गुन्हेगारी अभिलेखांची पाहणी करण्यात आली. संबंधित इसम सातत्याने गुन्हे करीत असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांच्या गुन्हेगारीस आळा बसावा तसेच कठोर व परिणामकारक प्रतिबंधक कारवाई करण्यासाठी डॉ. कुणाल सोनवणे, उपविभागीय पोलीस अधिकारी, संगमनेर विभाग, संगमनेर यांनी हद्दपारीचे प्रस्ताव सादर केले. त्यानुसार उपविभागीय दंडाधिकारी, संगमनेर विभाग यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आले.

हद्दपार करण्यात आलेल्या सात व्यक्ती

१. निलेश राजेंद्र काठे (रा. देवाचा मळा, संगमनेर, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) — हद्दपारी कालावधी दि. ०८/०९/२०२६ ते दि. ०७/०९/२०२७ (०१ वर्ष). अहिल्यानगर जिल्हा तसेच पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुका आणि नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुका येथे प्रवेशास मनाई.

२. सिद्धार्थ उर्फ सिद्धांत दिपक मावस, (रा. चरत हॉस्पी जवळ, संगमनेर, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) — हद्दपारी कालावधी दि. ०८/०९/२०२६ ते दि. ०७/०९/२०२७ (०१ वर्ष). अहिल्यानगर जिल्हा तसेच पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुका आणि नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुका येथे प्रवेशास मनाई.

३. संपत उर्फ प्रशांत शांताराम गागरे, (रा. कोळवाडे, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) — हद्दपारी कालावधी दि. ०८/०९/२०२६ ते दि. ०७/०९/२०२८ (०२ वर्षे). अहिल्यानगर जिल्हा तसेच पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुका आणि नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुका येथे प्रवेशास मनाई.

४. निलेश रामदास आरोटे, (रा. ब्राम्हणवाडा, ता. अकोले, जि. अहिल्यानगर) — हद्दपारी कालावधी दि. ०८/०९/२०२६ ते दि. ०७/०३/२०२७ (०६ महिने). अहिल्यानगर जिल्हा तसेच पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुका आणि नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुका येथे प्रवेशास मनाई.

५. महेंद्र बाबासाहेब निळे, (रा. मिर्झापूर, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) — हद्दपारी कालावधी दि. ०८/०९/२०२६ ते दि. ०७/०९/२०२७ (०१ वर्ष). अहिल्यानगर जिल्हा तसेच पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुका आणि नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुका येथे प्रवेशास मनाई.

६. अजमत लतीफ कुरेशी, (रा. जमजम कॉलनी, संगमनेर, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) — हद्दपारी कालावधी दि. ०३/०९/२०२६ ते दि. ०२/०९/२०२८ (०२ वर्षे). अहिल्यानगर जिल्हा तसेच पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुका आणि नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुका येथे प्रवेशास मनाई.

७. सुयोग अशोक दवंगे, (रा. हिवरगावपावसा, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) — हद्दपारी कालावधी दि. ०३/०९/२०२६ ते दि. ०२/०९/२०२८ (०२ वर्षे). अहिल्यानगर जिल्हा तसेच पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुका आणि नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुका येथे प्रवेशास मनाई.

आणखी २५ आरोपींवर कारवाईची तयारी

सातत्याने गुन्हेगारी अभिलेख असलेल्या व्यक्तींवर तडीपारीची कारवाई सुरू असून, संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील २५ रेकॉर्डवरील आरोपींचे तडीपार प्रस्ताव सादर करण्यास नव्याने आदेशित करण्यात आले आहे. त्यामुळे आगामी काळात आणखी आरोपींवर हद्दपारीची कारवाई होण्याची शक्यता आहे. 

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!