संगमनेर शिवसेना (ठाकरे) यांच्या वतीने शासकीय कागदपत्रांचे मार्गदर्शन व नोंदणी शिबिर संपन्न !
संगमनेर | प्रतिनिधी
हिंदुरुदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त रविवारी (दि. 26 एप्रिल 2026) सकाळी 9 ते सायं. 5 या वेळेत संगमनेर येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) यांच्या वतीने शासकीय कागदपत्रांचे मार्गदर्शन व नोंदणी शिबिर आयोजित करण्यात आले.
या शिबिरामध्ये नागरिकांसाठी विनामूल्य आधार कार्ड दुरुस्ती, मतदान कार्ड दुरुस्ती, ई-श्रम कार्ड, आभा कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड तसेच विविध शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

“80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण” या ब्रीदवाक्याने प्रेरित होऊन, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून व जिल्हाप्रमुख सचिन कोते पाटील आणि उपजिल्हाप्रमुख अमर कतारी यांच्या मुख्य उपस्थितीत हा सामाजिक उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात आला. शिवसेना नेते खासदार संजय राऊत, खासदार अनिल देसाई, खासदार भाऊसाहेब वाकचौरे शिर्डी लोकसभा संपर्कप्रमुख आमदार सुनील शिंदे, विधानसभा संपर्कप्रमुख सूर्यकांत शिंदे, निरीक्षक झिशान चंगेज मुलतानी तसेच इतर पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात हा उपक्रम पार पडला.
उपजिल्हाप्रमुख अमर कतारी यांच्या सूचनेवरून शहर प्रमुख फैसल सय्यद व अमित चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली अलकानगर येथे हे शिबिर पार पडले. यावेळी जिल्हाप्रमुख सचिन कोते यांनी उपस्थित राहून या उपक्रमाचे कौतुक केले. आगामी काळात शिवसेनेचे सामाजिक कार्य अधिक बळकट करण्याचा विश्वास व्यक्त केला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विचार घराघरात पोहोचून घराघरात शिवसैनिक तयार करण्यासाठी व लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी सदैव तत्पर राहण्याचे आदेश देखील कोते यांनी दिले .

या शिबिरात नागरिकांना रेशन कार्ड संदर्भातील नवीन 12 अंकी कोड, नाव समाविष्ट/वगळणे, नवीन मतदार नोंदणी, एसआयआर नोंदणी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करण्यात आले व गेल्या दोन महिन्यापासून सुरू असलेल्या उपक्रम अंतर्गत 25 नागरिकांना रेशन कार्ड देखील वाटप करण्यात आले.
यावेळी अमर कतारी यांनी नागरिकांना एसआयआर मतदान नोंदणीचे महत्त्व पटवून दिले व शासनाच्या योजना या प्रत्येक नागरिकाचा हक्क असल्याचे सांगितले. शिवसेना नेहमीच जनतेच्या सेवेसाठी तत्पर राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत सर्व माहिती शहर प्रमुख फैसल सय्यद यांनी दिली, तर अमित चव्हाण यांनी उपस्थितांचे स्वागत केले. तालुकाप्रमुख भाऊसाहेब हासे व भीमाशंकर पावसे वाहतूक सेनेचे जिल्हाप्रमुख इम्तियाज शेख यांनीही उपक्रमाचे कौतुक केले.

संघटक दीपक साळुंके, समन्वयक बाळासाहेब घोडके, माजी शहरप्रमुख पप्पू कानकाटे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक विजय सातपुते, व्यापारी आघाडी शहर प्रमुख संभव लोढा, 32 गाव आश्वी प्रमुख प्रकाश गायकवाड, उपशहर प्रमुख कैलास गायके, नितीन पारखे, लिंगमूर्ती चिंता, युवा सेना विधानसभा प्रमुख अमोल डुकरे, तालुकाप्रमुख भाऊसाहेब वराळे, परवेज शेख, उपशहर प्रमुख इरफान सय्यद विभाग प्रमुख जमीर करीम शेख, शाखा प्रमुख अजीम अत्तार, शिवसैनिक
मुसा कासम पठाण,, फाईक इम्तियाज शेख,, नईम शादाब पठाण, इम्रान अय्युब सय्यद, अतिक फारुक पटेल, मतीन याकूब शेख, शाहिद हसन बेपारी, अकिब महम्मद सय्यद, मोईन नईम पिंजारी, रिजवान सय्यद, अरकान सय्यद, अंगणवाडी सेविका उपस्थित होते.
