शासनाच्या योजनांचा लाभ घ्या पण एजंटांना बळी पडू नका – आमदार अमोल खताळ

बांधकाम कामगारांना साहित्य वाटप

संगमनेर / प्रतिनिधी —

केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक कल्याणकारी योजना आहेत. या सर्व योजनांवर सर्वसामान्य जनतेचा हक्क आहे त्या योजनांचा लाभ घेण्यासाठी कोणालाही पैसे देण्याची गरज नाही. कोणत्याही एजंटच्या माध्यमातून काम करू नका. कुणी तुमच्याकडे पैसे मागत असेल थेट संपर्क साधा संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा आमदार अमोल खताळ यांनी दिला

शहरातील मातोश्री लॉंन्स येथे बांधकाम कामगारांना आमदार खताळ यांच्या हस्ते साहित्य वाटप करण्यात आले, त्यावेळी बांधकाम कामगारांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. भाजपचे ज्येष्ठ नेते भीमराज चत्तर, शिवसेना शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी, भाजप तालुकाध्यक्ष गुलाब भोसले, अहिल्यानगर येथील सहाय्य कामगार आयुक्त रेवनाथ भिसले, सरकारी कामगार अधिकारी स्वप्निल जाधव, दुकाने निरीक्षक ललित दाभाडे, भाजप राज्यकार्य कारणी सदस्य दादासाहेब गुंजाळ, भाजप उपाध्यक्ष राहुल दिघे, शिवसेना उपतालुका प्रमुख बादशाह गुंजाळ, नगरसेविका साक्षी सूर्यवंशी, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष रऊफ शेख, बाळासाहेब खेमनर, अशोक कानवडे, डॉ. महेंद्र कोल्हे, डॉ. सोमनाथ कानवडे, सुशील शेवाळे, सार्थक शेवाळे, शशांक नामन आदी उपस्थित होते.

    

आमदार खताळ म्हणाले सध्याचे सरकार कामगार, महिला शेतकरी आणि तरुणांचे सरकार असून प्रत्येक घटकाच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. तालुक्यात नोंदणीकृत बांधकाम कामगारांची संख्या २४ हजार १२६ असून विविध योजनांद्वारे हजारो कामगारांना लाभ मिळाला आहे. शिष्यवृत्ती योजनेतून ६ हजार ८७७ लाभार्थ्यांना सुमारे ७ कोटी ६० लाख रुपयांची मदत वितरित केली आहे. तसेच सुरक्षा संच, अत्यावश्यक वस्तू संच आणि इतर योजनांचाही लाभ मिळाला असल्याचेही आमदार अमोल खताळ यांनी सांगितले.

   यावेळी बांधकाम कामगारांसाठी असलेल्या विविध योजनांची माहिती सहाय्यक बांधकाम कामगार आयुक्त रेवनाथ भिसले यांनी दिली. सरकारी कामगार अधिकारी स्वप्निल जाधव आणि दुकाने निरीक्षक ललित दाभाडे यांनी योजनांचे सविस्तर मार्गदर्शन केले. मोठ्या संख्येने बांधकाम कामगार उपस्थित होते.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!