कौठे कमळेश्वर ग्रामपंचायत मध्ये 3 लाख 60 हजार रुपयांचा अपहार !….

ग्राम सुरक्षा यंत्रणा टॉवर उभारण्यात केला भ्रष्टाचार 

संगमनेर | प्रतिनिधी —

कौठे कमळेश्वर येथील ग्रामपंचायती मध्ये गावात सुरक्षा यंत्रणा टॉवर बसवण्या कामांमध्ये सरपंच ग्रामसेवक व ठेकेदार यांनी संगणमताने 3 लाख 60 हजार रुपये इतक्या रकमेचा अपहार केल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्य नागेश यादव व लक्ष्मण जोंधळे यांनी केला आहे. 

ग्रामपंचायत सदस्य नागेश मच्छिंद्र यादव व लक्ष्मण भागवत जोंधळे यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती यांच्याकडे 13 फेब्रुवारी 2026 रोजी अर्ज करू कौठे कमळेश्वर येथील सरपंच ग्रामसेवक व ठेकेदार यांनी संगनमताने गावामध्ये सुरक्षा यंत्रणा टॉवर उभारण्याच्या नावाखाली 3 लाख 60 हजार रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचे निदर्शनास आणून दिले. या कामांमध्ये मूळ आराखड्यामध्ये अडीच लाख रुपये तरतूद करण्यात आलेली आहे. सदर कामास कोणतीही प्रशासकीय मान्यता नसून तांत्रिक मान्यता ही घेण्यात आलेली नाही .काम करण्यापूर्वी सदर रक्कम ही ठेकेदाराला देण्यात आली आहे. याबाबत गटविकास अधिकारी यांनी तत्कालीन सरपंच वाल्हुबाई विठ्ठल वराडे, ग्रामसेवक व ठेकेदार यांना गटविकास अधिकारी यांनी नोटीस बजावली आहे. 

सदर काम हे लेखासंहिता 2011 मधील नियम प्रकरण तीन मधील नियम 8,9 नऊ प्रकरण 12 नियम मधील 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 या नियमांचे उल्लंघन झाले असून सदर नोटीस मिळताच उलट टपाली पुरावे दस्तावेज सादर करावेत याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहिल्यानगर यांनीही सदर ग्रामपंचायतला नोटीस दिली असून 3 लाख 60 हजार रुपये रकमेचा अपहार केल्याच्या बाबत खुलासा करावा अन्यथा पुढील कारवाई करण्यात येईल असे निर्देश दिले आहेत. 

या भ्रष्टाचाराची तातडीने चौकशी होऊन दोशींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी कौठे कमळेश्वर येथील ग्रामपंचायत सदस्य नागेश मच्छिंद्र यादव लक्ष्मण भागवत जोंधळे व इतर ग्रामस्थांनी केली आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!