संगमनेर तालुक्यात घरफोडी…!

दोन लाखाच्या दारूच्या बाटल्या चोरल्या…

 संगमनेर प्रतिनिधी —

संगमनेर तालुक्यात ग्रामीण भागात घरफोडी करून चोरट्यांनी एका बियर बार परमिट रूम मधून इंग्रजी दारूच्या बाटल्या लंपास केल्या आहेत. या घरफोडीमध्ये एकूण 2 लाख 3 हजार 550 रुपयांचा माल चोरीस गेला असून यामध्ये मॅकडॉल व्हिस्की व रॉयल स्टॅग कंपनीच्या दारूच्या बाटल्या चोरण्यात आल्या आहेत.

संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे या गावातील हॉटेल रुपेश परमिट रूम बियर बार मध्ये खिडकीचे गज कापून ही घरफोडी करण्यात आली आहे.

परमिट रूम बियर बार मधील काउंटर मध्ये असलेल्या आणि परमिट रूमच्या आतील स्टोअर रूम मधून दारूच्या बाटल्या लंपास करण्यात आलेल्या आहेत. तसेच बियर बार मध्ये सीपी प्लस कंपनीचा असलेला डीव्हीआर देखील चोरट्यांनी चोरून नेला आहे. बियर बार च्या खिडकीचे गज कापून आत प्रवेश करून अज्ञात चोरट्यांनी ही घरफोडी केली असल्याचे समोर आले आहे. 

संगमनेर तालुका पोलिसांनी यासंदर्भात गुन्हा दाखल केला आहे. सुरेश गंगाधर दिघे (राहणार तळेगाव दिघे, तालुका संगमनेर) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक सातपुते हे पुढील तपास करीत आहेत.

 

 

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!