संगमनेर मध्ये रविवारी विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण !….

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, डॉ. सुजय विखे व आमदार अमोल खताळ यांची प्रमुख उपस्थिती

संगमनेर | प्रतिनिधी : 

संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी, हिवरगाव पावसा व संगमनेर खुर्द परिसरात विविध विकासकामांचा भव्य भूमिपूजन व लोकार्पण सोहळा रविवार, दि. १ मार्च २०२६ रोजी राज्याचे जलसंपदामंत्री तथा अहिल्या नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभहस्ते होणार आहे. यावेळी भाजप प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी खासदार डॉ. सुजयदादा विखे पाटील तसेच संगमनेर विधान सभा मतदारसंघाचे आमदार अमोल खताळ पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

    चंदनापुरी ते शिरापूर रस्त्यावर उभारण्यात येणाऱ्या ३ कोटी २४ लाख ७० हजार रुपये खर्चाच्या पुलाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. या पुलामुळे परिसरातील वाहतूक सुलभ होणार असून शेतकरी व ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळणार आहे.सी.आर. कम एस्केप कामाचे लोकार्पण सायंकाळी साडेपाच वाजता होणार आहे. 

तसेच हिवरगाव पावसा येथे निळवंडे प्रकल्पाच्या उर्ध्व प्रवरा उजवा कालवा (सा. क्र. ३५७३०) येथे १ कोटी ३२ लाख रुपये खर्चाच्या सी.आर. कम एस्केप (CR-Cum Escape) कामाचे लोकार्पण करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे कालव्याच्या पाण्याचे व्यवस्थापन अधिक प्रभावी होणार असून परिसरा तील शेतीला मोठा फायदा होणार आहे रायतेवाडी फाटा, संगमनेर खुर्द येथे बसविण्यात आलेले पथदिव्यांचे लोकार्पण सायंकाळी साडेसहा वाजता होणार आहे या पथदिव्यांमुळे रात्रीच्यावेळी वाहतूक अधिक सुलभ आणि सुरक्षित होण्यास मदत होणार आहे.

    या सर्व विकासकामांमुळे वरील गावाच्या परिसरातील पायाभूत सुविधांमध्ये महत्त्वपूर्ण वाढ होणार असल्याने ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या सर्व कार्यक्रमास महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन चंदनापुरी हिवरगाव पावसा रायतेवाडी संगमनेर खुर्द येथील महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!