श्रमिक कनिष्ठ महाविद्यालयास राज्यस्तरीय रिंग टेनिस स्पर्धेत विजेते पद 

संगमनेर प्रतिनिधी दि. 4

शासकीय विज्ञान महाविद्यालय, चामोर्शी रोड,जिल्हा गडचिरोली येथे घेण्यात आलेल्या शालेय राज्यस्तरीय रिंग टेनिस स्पर्धेत श्रमिक कनिष्ठ महाविद्यालयाच्या १९ वर्षाखालील मुलांच्या संघाने विजेतेपद पटकावले.

या स्पर्धेत पैयावुल मयूर रमेश, उगले तन्मय भागवत,पवार, राधेय विजय,अमृत माधव राहणे या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेचे आयोजन क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य,पुणे व भारतीय शालेय खेळ महासंघ व संबंधित खेळाच्या राष्ट्रीय एकविध खेळ संघटनेच्या नियमावलीनुसार व मार्गदर्शक तत्त्वानुसार करण्यात येते.

विजयी संघाचे शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ.संजय मालपाणी, सचिव अनिल राठी, प्राचार्य डॉ.अरुण गायकवाड, उपप्राचार्य डॉ.राजेंद्र ढमक, पर्यवेक्षक प्रा.आप्पासाहेब गुंजाळ, जिमखाना विभागाचे प्रा.नीलेश गुंजाळ, प्रा.भागवत उगले, सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष अभिनंदन केले.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!