उत्तम आरोग्यासाठी योग ही भारताची विश्वाला देणगी — जिल्हा माहिती अधिकारी सुरेश पाटील

शिर्डी प्रतिनिधी – 

योग ही भारताने विश्वाला दिलेली अमूल्य देणगी असून उत्तम आरोग्यासाठी विद्यार्थ्यांनी मोबाईलपासून दूर राहून दररोज योगाभ्यास करावा आणि मैदानी खेळांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी सुरेश पाटील यांनी केले.

भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयांतर्गत केंद्रीय संचार ब्यूरो, अहिल्यानगर यांच्या वतीने माजी सैनिक कै. आर. बी. तथा आप्पा घोडके स्मृती प्रतिष्ठान, महाराष्ट्र प्रांत आणि सूर्यतेज संस्था, कोपरगाव यांच्या विशेष सहकार्याने आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सोमैया विद्या मंदिर, लक्ष्मीवाडी येथे योग प्रशिक्षण कार्यक्रम व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या प्रसंगी जिल्हा माहिती अधिकारी सुरेश पाटील, सूर्यतेज संस्थेचे संस्थापक तथा स्वच्छतादूत सुशांत घोडके, केंद्रीय संचार ब्यूरोचे बबलूकुमार, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष देविदास पाचपाटील, मुख्याध्यापक संजय राऊत, योगतज्ञ प्रशिक्षक संतोष नलगे, महेश थोरात, रोहित काळे, पर्यवेक्षक बाबासाहेब खळदकर, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र आगलावे आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रारंभी योग प्रशिक्षकांनी योगाचे महत्त्व विशद करत ओंकार उच्चारण, सूर्यनमस्कार, पद्मासन, उत्कटासन, पश्चिमोत्तानासन, ताडासन, वृक्षासन, बकासन, उत्तानपादासन, सर्वांगासन आणि हलासन यांसह विविध योगासनांची शास्त्रोक्त माहिती दिली. तसेच या आसनांची प्रात्यक्षिकेही सादर करण्यात आली. त्यानंतर ध्यान व प्रार्थनेने प्रशिक्षणाचा समारोप झाला.

यावेळी चित्रकला स्पर्धा तसेच योग प्रशिक्षणात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्रे आणि शालेय साहित्य देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे स्वागत मुख्याध्यापक संजय राऊत यांनी केले, तर प्रास्ताविक सुशांत घोडके यांनी केले. सूत्रसंचालन अनिता शिंदे यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी क्रीडा शिक्षक संजय अमोलिक, राम ढोकचौळे, रुपाली टेके, माधुरी गायकवाड, योगेश चव्हाण, बाळासाहेब जोरी यांच्यासह सोमैया विद्या मंदिर येथील शिक्षक-शिक्षिकांनी विशेष परिश्रम घेतले. लक्ष्मीवाडीसारख्या ग्रामीण भागात योग प्रशिक्षण कार्यक्रम प्रथमच आयोजित करण्यात आल्याने विद्यार्थी आणि पालकांनी समाधान व्यक्त करत आयोजकांचे आभार मानले.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!