ठिबक सिंचन पाईप चोरी करणारी टोळी गजाआड !

संगमनेरच्या उपविभागीय पोलीस अधिकारी पथकाची कामगिरी

प्रतिनिधी —

शेतकऱ्यांच्या शेतातून ठिबक सिंचनचे पाईप चोरी करणारे टोळी पोलिसांनी पकडली असून यात दोन आरोपींना अटक केली आहे. पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय कार्यालयाच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

फरदिन इसाक शेख, नौशाद इसाक शेख (दोन्ही राहणार अकोले नाका, तालुका संगमनेर) यांना याप्रकरणी ताब्यात घेऊन अटक केली आहे.

मागील काही दिवसांपासून संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतातील ठिबक सिंचन चे पाईप चोरी करण्याचे प्रकार वाढले होते. सातत्याने या चोऱ्या होत होत्या. विविध ठिकाणच्या ग्रामीण भागातील तक्रारी पोलिसांपर्यंत पोहोचल्या होत्या. शेतकऱ्यांच्या फिर्यादीवरून गुन्हे देखील दाखल करण्यात आले होते.

पोलिसांनी या प्रकरणी गंभीर दखल घेतली होती पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना गुप्त बातमीदार मार्फत खबर ठिबक सिंचनचे पाईप चोरी करणारे आरोपी हे कोण आहेत याची माहिती मिळाली. दरम्यान विविध गुन्ह्यांच्या तपासासाठी नाकाबंदी, कोंबींग ऑपरेशन, आरोपींच्या घरावर अचानक छापा अशी कार्यवाही पोलिसांची चालूच होती.

मिळालेल्या माहितीनुसार उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने ठिबक सिंचन पाईप चोरी करणारे फरदिन इसाक शेख, नौशाद इसाक शेख (दोन्ही राहणार अकोले नाका तालुका संगमनेर) यांना याप्रकरणी ताब्यात घेऊन अटक केली आहे.

पकडलेले हे दोन्ही आरोपी सराईत गुन्हेगार असून संगमनेर, अकोले, शहर, तालुका पोलीस ठाण्यांमध्ये या आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये चोरीचे गुन्हे दाखल आहेत. या आरोपींकडून विविध गुन्ह्यांची उकल होत असून शहर आणि तालुक्यात घडलेले गुन्हे उघडकीस येत आहेत.

उपअधीक्षक वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी वमने, पोलीस नाईक राहुल डोके, राहुल सारबंदे, सचिन उगले यांच्यासह पथकाने ही कारवाई केली आहे. पुढील तपास सचिन उगले हे करीत आहेत.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!