करियर गायडन्स काळाची गरज – श्रीकांत माघाडे
प्रतिनिधी —
विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्यासाठी करियर गायडन्स ची गरज असल्याचे प्रतिपादन प्राचार्य श्रीकांत माघाडे यांनी केले आहे.

श्री संत जनार्दन स्वामी विद्यालय कोल्हेवाडी येथे अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी करियर गाईडन्स या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

श्रीकांत माघाडे यांनी विद्यार्थ्यांना “यशाचा मंत्र” या विषयावर मार्गदर्शन केले. “आज करियर गाईडन्स करिअर घडविण्यासाठी विद्यार्थ्यांना अत्यंत उपयोगी आहे. ती काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांनी ठरवले तर करिअरच्या बाबतीत कोणतीही गोष्ट आपल्या यशाच्या आड येऊ शकत नाही. यश नक्की मिळतेच.” असे सांगितले.

प्राध्यापक व विश्वस्त ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य राहुल गोर्डे नाशिक यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान झाले. या कार्यक्रमाचे नियोजन नेहमीपेक्षा आगळ्यावेगळ्या पद्धतीने करण्यात आले. या कार्यक्रमाचे सुरुवातीपासून शेवटपर्यंतचे सूत्रसंचालन व भाषणे इंग्रजीतून करण्यात आली.

उपप्राचार्य राहुल गोर्डे यांनी करिअरच्या विविध क्षेत्रांची माहिती अतिशय नाविन्यपूर्ण व आकर्षक पद्धतीने दिली. कोणत्याही करिअरसाठी सातत्य पूर्ण अभ्यास, ध्येयाप्रती संपूर्ण निष्ठा, स्मार्ट वर्क, प्रामाणिकपणा व कामाचे नियोजन असेल तर प्रत्येक विद्यार्थ्याला नक्की यश मिळेल असे यावेळी उपप्राचार्य गोर्डे यांनी सांगितले.

संगमनेर साखर कारखान्याचे संचालक डॉ. तुषार दिघे, ज्युनिअर कॉलेजचे प्रा. अरुण पानसरे, प्रा. राहुल वर्पे, सचिन पगारे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंग्लिश मध्ये प्रा. मयुरी शिंदे यांनी केले. प्रा.कांचन हासे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. विद्या देवकर यांनी केले. विद्यार्थीनी साक्षी थोरात आपल्या मनोगतामध्ये म्हणाली की, आजच्या करिअर गायडन्स कार्यक्रमाचा खरोखरच सर्व विद्यार्थ्यांना फायदा होईल. व्याख्यात्यांनी अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शन करून आमचा आत्मविश्वास वाढवला. त्यांनी सुचवलेल्या सर्व प्रकारच्या युक्त्या आम्ही अभ्यास करताना वापरू व नक्कीच स्कॉलरशिप मिळवून दाखवू.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी साठी हर्षल कोल्हे, अरुण वामन शिक्षकांनी व बाळूमामा गायकवाड, नरेंद्र गायकवाड सुनील यादव या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मदत केली.

