संगमनेर मर्चंट बँकेची निवडणूक होणार !

प्रतिनिधी —

संगमनेर शहरातील नावाजलेल्या मर्चंट बँकेची निवडणूक होणार की नाही किंवा बिनविरोध होणार याविषयीच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून अर्ज छाननीच्या दिवशी मर्चंट बँकेची निवडणूक होणार असल्याचे चित्र आहे. मात्र उमेदवारी अर्ज माघारी नंतर चित्र अधिक स्पष्ट होईल.

संगमनेरमधील छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांची आर्थिक कामधेनू म्हणून परिचित असलेल्या संगमनेर मर्चंट बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत १७ जागांसाठी ३९ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. अनुसूचित जाती जमाती मतदार संघातून नगरसेवक राजेंद्र वाकचौरे यांचा एकमेव अर्ज असल्याने सत्ताधारी गटाकडून त्यांनी पहिली विजय सलामी दिली असून त्यांच्या बिनविरोध निवडीची औपचारिकता बाकी आहे.

गुरुवारी झालेल्या उमेदवारी अर्जाच्या छाननी नंतर त्यामुळे १६ जागांसाठी ३८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. उद्यापासून (१९ मे) २ जूनपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. त्यानंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार असले तरी, दोन पॅनलमध्ये सरळ लढत होते की सत्ताधारी गटाविरोधात काही अपक्ष निवडणूक मैदानात उतरतात हे माघारी नंतरच स्पष्ट होणार आहे. अहमदनगर, नासिक, पुणे असे तीन महत्त्वाच्या जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या या बँकेच्या सभासदांची संख्या पाच हजारावर आहे.

बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी १७ जूनला मतदान होणार असून १८ जूनला मतमोजणी होणार आहे. उद्योजक राजेश मालपाणी यांच्या अधिपत्याखाली सहकारात दिशादर्शक काम करणाऱ्या बँकेच्या संचालक मंडळात त्यांच्या पॅनल कडून कोणाची वर्णी लागते याची उत्सुकता ताणली गेली आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी सर्जेराव कांदळकर यांच्यासमोर गुरुवारी उमेदवारी अर्जांची छाननी झाल्यानंतर छाननीमध्ये सर्वच्या सर्व अर्ज वैध ठरले.

मतदार संघ निहाय उमेदवार पुढीलप्रमाणे:

सर्वसाधारण मतदारसंघ (12 जागा)जुगलकिशोर जगदीश बाहेती राजेश ओंकारनाथ मालपाणी प्रकाश सुरेश राठी श्रीगोपाल रामनाथ पडतानी दिलीपकुमार मानकचंद पारख सुनील शांताराम दिवेकर संतोष मोहनलाल करवा सम्राट शामसुंदर भंडारी प्रफुल्ल राजमल बोगावत संदीप श्रीनिवास जाजू राजेश मदनलाल करवा प्रकाश विश्वनाथ कलंत्री अरुण माधवराव शहरकर मधुसूदन सुभाषचंद्र नावंदर अमित अनिल अट्टल मुकेश रमणलाल कोठारी महेश बिहारीलाल डंग वैभव सुनील दिवेकर संजय शंकरलाल राठी प्रवीण सिद्राम दिड्ड़ी सुनिता मनीष मणियार

अनुसूचित जाती जमाती (१ जागा)

राजेंद्र कारभारी वाकचौरे (बिनविरोध)

महिला सर्वसाधारण (2 जागा)

कीर्ती राजेश करवा सुनिता मनीष मणियार सीमा संजय अंत्रे उषा किशोरकुमार नावंदर ज्योती सचिन पलोड

इतर मागास प्रवर्ग (१ जागा)

सुनील शांताराम दिवेकर रवींद्र रत्नाकर पवार ज्ञानेश्वर बाबुराव कर्पे अजित रंगनाथ ताजणे अरुण माधवराव शहरकर

भटक्या विमुक्त जाती /विशेष मागास प्रवर्ग (१ जागा)

गुरुनाथ भिकन बाप्ते गजानन शंकरराव पडवळ संदीप दत्तात्रय चोथवे श्याम विजय भडांगे सदानंद अशोक शिसोदे प्रवीण सिद्राम दिड्ड़ी

सोमनाथ सदाशिव कानकाटे

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!