अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदी सुनील दातीर यांची निवड
सचिवपदी सुधाकर देशमुख ; नुतन कार्यकारिणी जाहीर
प्रतिनिधी —
तालुक्यातील अग्रगण्य असलेल्या अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी या शैक्षणिक शिखर संस्थेच्या अध्यक्षपदी इंजिनियर सुनील दातीर, उपाध्यक्षपदी विठ्ठल चासकर, सेक्रेटरी पदी सुधाकर देशमुख, सहसेक्रेटरीपदी बाळासाहेब भोर, खजिनदार पदी धनंजय संत यांची नियुक्ती संस्थेचे कार्यकारी विश्वस्त तथा माजी मंत्री मधुकर पिचड यांनी जाहिर केली.

अकोले एज्युकेशन सोसायटीच्या विश्वस्त मंडळाच्या आज बुधवारी (१३ एप्रिल) रोजी झालेल्या बैठकीत काही विश्वस्त व नविन कार्यकारणीची निवड जाहिर करण्यात आली. यावेळी कार्यकारी विश्वस्त मधुकर पिचड, कायम विश्वस्त सिताराम गायकर व कायम विश्वस्त वैभव पिचड उपस्थित होते.

यामध्ये कायम विश्वस्त पदी गिरजाजी जाधव, स्वीकृत विश्वस्त पदी सुरेश कोते, मधुकर सोनवणे, संपत गोविंद वैद्य यांची नियुक्ती केली.
तर कार्यकारणी सदस्यपदी यशवंतराव आभाळे, सुधाकर आरोटे, अॅड.आनंद नवले, डॉ. दामोधर सहाणे, शरद देशमुख, कचरु शेटे, अशोक भांगरे, कल्पना सुरपुरिया, रमेश जगताप, मच्छिंद्र धुमाळ यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती संस्थेचे कार्यकारी विश्वस्त तथा माजी मंत्री मधुकर पिचड यांनी दिली. ही निवड प्रकिया झाल्यानंतर सर्व नविन विश्वस्त, कार्यकारणीचा सत्कार करण्यात आला .

यावेळी मधुकर पिचड म्हणाले की, अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी ही तालुक्याची शिखर शैक्षणिक संस्था असून या संस्थेला मोठी परंपरा आहे. येथे शिकत असलेले अनेक गरीब आदिवासी विद्यार्थी यांच्यासाठी शैक्षणिक सुविधा निर्माण होणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने नविन कार्यकारिणीने निर्णय घ्यावेत. अशी सुचना करून शुभेच्छा दिल्या.

आभार नुतन सेक्रेटरी सुधाकर देशमुख यांनी मानले. या नूतन पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

