साथी सायन्ना एनगंदूल यांच्या अस्थींचे वृक्षारोपणात विसर्जन  

प्रतिनिधी —

राष्ट्र सेवा दल व समाजवादी चळवळींचे अग्रणी, विडी कामगारांच्या हितासाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित केलेले साथी सायन्ना एनगंदूल यांच्या अस्थींचे विसर्जन नदीचे पाण्यात न करता संगमनेर येथील केशव तिर्थ या ठिकाणी वडाचे झाडाचे रोपन करून करण्यात आले.

कष्टकरी कामगार शेतकरी, विडी कामगार, असंघटित कामगारांच्या हितासाठी लढा देत पुरोगामी विचारांचा प्रसार करीत साथी सायन्ना एनगंदूल यांनी आपल्या आयुष्यात साने गुरुजींचा वारसा पुढे चालवला. पारंपारिक चाली रिती, रुढी परंपरा यांना सतत फाटा दिला होता. त्यांच्या विचारांचा आदर करीत वडाचे झाड लावून त्यात साथी सायन्नांचे चिरंजीव चंद्रकांत यांनी सर्व कुटुंबीय, तसेच आमदार डॉ. सुधिर तांबे व प्रमुख सामाजिक व पुरोगामी नेत्यांचे उपस्थितीत अस्थी अर्पण केल्या व पर्यावरण पूरक दशक्रिया विधीचा नवीन आदर्श निर्माण केला.

अशाप्रकारच्या पर्यावरण पूरक दशक्रिया विधीचे सर्वत्र स्वागत व कौतुक होत आहे.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!