कळसूबाई शिखरावर गुढी उभारून मराठी नवीन वर्षाचे स्वागत..!

संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क 

गुढीपाडवा हा चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा होणारा महाराष्ट्रीयन हिंदू नववर्षाचा पहिला दिवस आहे.हे नवीन वर्ष,निसर्गातील वसंत ऋतूचे आगमन,शेतीचा हंगाम,आणि विजयाचे प्रतीक म्हणून साजरा होणारा सण आहे.महाराष्ट्रातील सर्वोच्च कळसूबाई शिखरावर अखंडितपणे गेल्या २९ वर्षांपासून घोटी शहरातील कळसूबाई मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष भगीरथ मराडे यांच्या संकल्पनेतून व त्यांच्या नेतृत्वाखाली गिर्यारोहक दरवर्षी गुढी उभारून गुढीपाडवा सण साजरा करतात.

सालाबादप्रमाणे यावर्षी देखील मंडळाच्या गिर्यारोहकांनी भल्या पहाटेच सर्वोच्च शिखर सर करून उगवत्या सूर्योदयाच्या प्रथम किरणांवेळी कळसूबाई मातेचे पंचामृताने दुग्धअभिषेक करून पूजन केले तसेच गुढीचे देखील पूजन करून मातेच्या मंदिरासमोर गुढी उभारून गुढीपाडवा सण साजरा करीत प्रभू श्रीरामचंद्र,कळसूबाई माता,छत्रपती शिवाजीराजांच्या जयघोषात मराठी नवीन वर्षाचे स्वागत केले.

मंडळाने सामाजिक बांधिलकी ठेवून “सर्वधर्म समभाव” जपत गुढीपाडव्याच्या व रमजानईदच्या सर्वांना शुभेच्छा देत मराठी नवीन वर्षाचे स्वागत केले.दरवर्षी कळसूबाई मित्र मंडळ नवरात्रीत रोज नऊ दिवस कळसुबाई माते चरणी नतमस्तक होतात,इंग्रजी नूतन वर्षाचे स्वागत देखील सर्वोच्च शिखरावर करतात.या गुढीपाडवा सण उत्सवात कळसूबाई मित्र मंडळाचे अध्यक्ष भगीरथ मराडे,नीलेश पवार,प्रवीण भटाटे,काळू भोर,सुधाकर तांबे,संजय शेवाळे,सुरेश चव्हाण,नामदेव जोशी,भागीरथ म्हसणे,नाना टाकळकर,बाळू आरोटे,अशोक हेमके,सागर पलटणे,ज्ञानेश्वर काळे,देवीदास पाखरे,चेतन जाधव, संदीप परदेशी तसेच इतरही गिर्यारोहक सहभागी झाले होते.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!