झाकीर नाईक याने पैसे दिल्याची महसूल मंत्री विखे पाटील यांची कबुली !

दहा वर्षांपूर्वीच चौकशी झाली आहे…

खासदार संजय राऊत यांच्या आरोपाला उत्तर

प्रतिनिधी —

झाकिर नाईक याने संस्थेला अडीच ते साडेतीन कोटी रुपये दिले असल्याचे कबुली महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. मात्र या प्रकरणाची दहा वर्षांपूर्वी चौकशी झाली असून त्यात कुठलाही गैरव्यवहार आढळलेला नाही. असे त्यांनी सांगितले.

देशद्रोही ठरवलेल्या झाकीर नाईक ने महसूल मंत्री विखे पाटील यांच्या संस्थेला साडेचार कोटी रुपये दिल्याचा आरोप शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केला होता. या आरोपाला उत्तर देताना महसूल मंत्री विखे पाटील यांनी वरील प्रतिक्रिया दिली आहे.

विखे पाटील म्हणाले की, झाकीर नाईक त्याने अडीच ते साडेतीन कोटी रुपये संस्थेला दिले होते. त्या प्रकरणाची चौकशी झाली आहे. भारत सरकारने दहा वर्षापूर्वी याची चौकशी केली आहे. आणि केस बंद देखील केली आहे. झाकीर नाईक याने देणगी दिली त्यावेळेस तो देशद्रोही ठरवला गेला नव्हता.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!