तुळजाभवानी मंदिरात उंदरांचा धुमाकूळ !

संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —

तुळजापूरातील श्री तुळजाभवानी मंदिरात उंदरांनी धुमाकूळ घातला आहे. भाविकांकडून मिळणारे प्रसादरुपी पेढे, साखर, लाडु अन्य गोड पदार्थांवर उंदीरमामा ताव मारत आहेत. या प्रकारामुळे मंदिर व्यवस्थापनाने तातडीने उपाययाेजना राबविण्यासाठी ठाेस पावले उचचली आहेत.

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या मंदिरात उंदरांचा धुमाकूळ पाहायला मिळत आहे. देवीच्या मूख्य गाभाऱ्यात देखील मोठ्या प्रमाणावर उंदराचा वावर पाहायला मिळत आहे. दरम्यान देवीच्या मंदीरात उंदीर फिरत असल्याचा व्हिडिओ देखील व्हायरल हाेत आहे.

या प्रकारामुळे मंदिर संस्थानच्या वतीने उपाययोजना सुरु करण्यात आली आहे. उंदीर पकडण्यासाठी गाभाऱ्यात पिंजरा लावण्यात आला आहे. या उंदराचा बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती मंदीर प्रशासनाने दिली आहे.

दरम्यान मंदिरात २४ तास नंदादीप तेवत असतो तसेच सिसिटिव्हीसह दिवे सुरु असतात त्यामुळे उंदराच्या कुरतडण्याने शार्ट सर्कीटसह अन्य प्रकार घडु नये यासाठी तात्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागणी पुजारी वर्गातून केली जात आहे. (सौजन्य साम टीव्ही)

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!