आमदार डॉक्टर सुधीर तांबेंवर काँग्रेसची संक्रांत !
शिस्तभंग केल्याप्रकरणी पक्षातून निलंबित
प्रतिनिधी —
काँग्रेस पक्षाने उमेदवारी देऊनही विधान परिषदेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल न केल्याने आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांच्यावर काँग्रेस पक्षाने निलंबनाची कारवाई केली आहे. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी होईपर्यंत हे निलंबन असणार आहे. तसे पत्र आज काँग्रेसच्या शिस्तभंग समितीचे सदस्य सचीव तारीक अन्वर यांनी प्रसिद्धीस दिले आहे.

नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षांतर्गत बराच गोंधळ उडाला असून विद्यमान आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी शेवटच्या दिवशी उमेदवारी दाखल न करता त्यांचे पुत्र सत्यजित तांबे यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज भरल्याने आमदार डॉक्टर तांबे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे

काँग्रेस पक्षाविरुद्ध भूमिका घेतल्याने त्यांच्यावर ही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी होईपर्यंत हे निलंबन करण्यात आलेले आहे. काँग्रेस कमिटीच्या शिस्तभंग समितीचे सदस्य सचिव तारीक अन्वर यांनी यासंदर्भात या संदर्भात प्रसिद्ध पत्रक जारी केले आहे.

