नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार शुभांगी पाटील संपर्क क्षेत्राच्या बाहेर !

संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —

नाशिक पदवीधरच्या उमेदवार शुभांगी पाटील सकाळपासून नॉट रिचेबल आहेत अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता नाशिक पदवीधर निवडणुकीत नवा ट्विस्ट आला आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघात सुधीर तांबे यांनी काँग्रेसकडून अर्ज भरला नाही त्यानंतर सत्यजीत तांबे यांनी अपक्ष अर्ज भरला. ही सगळी देवेंद्र फडणवीस यांची खेळी आहे अशी चर्चा सुरू झाली त्यानंतर शुभांगी पाटील यांनी आपणीही निवडणुकीला उभं राहात असून उद्धव ठाकरे यांना भेटले आहे त्यांनी मला पाठिंबा देऊ असं आश्वासन दिलं आहे. आता त्याच नॉट रिचेबल आहेत. एकीकडे काँग्रेसने सुधीर तांबे यांच्यावरही कारवाई केली असल्याचं म्हटलं आहे. दुसरीकडे शुभांगी पाटील नॉट रिचेबल आहेत. त्यांचा फोनही लागत नाहीये. एबीपी माझाने हे वृत्त दिलं आहे. त्यामुळे या निवडणुकीत काय ट्विस्ट अँड टर्न येणार हे येत्या काळात अधिक स्पष्ट होत जाणार आहे.

शुभांगी पाटील अर्ज मागे घेणार का?

शुभांगी पाटील सकाळपासून संपर्क क्षेत्राच्या बाहेर असल्याने आता त्या उमेदवारी अर्ज मागे घेणार का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. भाजपाचे संकटमोचक असं समजले जाणारे गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये तळ ठोकला आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शुभांगी पाटील यांना नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी पाठिंबा दिला आहे. उद्धव ठाकरे यांना भेटल्यावर शुभांगी पाटील यांनी मीडियाशी संवाद साधला होता. त्यानंतर त्या नाशिकला परतल्या. मात्र त्या तेव्हापासून नॉट रिचेबल आहेत. त्यामुळे विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. सौजन्य दैनिक लोकसत्ता

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!