विद्यार्थ्यांना कपाळावर गंध लावण्यास बंदी केल्यामुळे शाळेच्या गेटवर आंदोलन

प्रतिनिधी —

बहुजन विद्या प्रसारक शिक्षण संस्थेचे डी. के. मोरे जनता विद्यालय शाळेतील शिक्षक कर्मचारी विद्यार्थ्यांना कपाळावर गंध लावण्यास विरोध करतात आणि विद्यार्थ्यांना मारतात, असे शाळेतील विद्यार्थ्यांकडून कळाले. भारत देशात हिंदू संस्कृतीचा अनादर शाळा करत आहे असा आरोप करत विद्यालयाच्या गेटवर शाळेचा निषेध करण्यासाठी आंदोलन करण्यात आले.

कपाळावरील गंधामुळे एकाग्रता वाढवणे, शितलता प्रदान करणे, असे अनेक वैज्ञानिक फायदे यात आहेत. महाराष्ट्र सरकारचा शाळेत टिळा लावण्यांचा अध्यादेशही पारीत केला आहे. शाळा ही विद्येचे मंदिर आहे. त्या मंदिरात कपाळावर गंध लावण्यास विद्यार्थ्यांचा हक्क आहे. त्यापासून आपण त्यांना वंचित ठेवू शकत नाही. गंध लावण्यास विरोध करू नये. केल्यास आपल्या विरोधात मोठे आंदोलन उभे केले जातील, असे निवेदन यावेळी देण्यात आले.

यावेळी अविनाश शहा, सिद्धेश पवार, अभिजित घाडगे, अभिनाथ शिंदे, आकाश बर्डे, पूजा अरगडे, रेखा गलांडे, ह.भ.प. रोहिणी राऊत, कृष्णा सारडा आदींनी हिंदू समाज व एकलव्य संघटनेच्या योगेश सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन केले. यावेळी संगमनेर तालुका पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!