किरीट सोमय्यांचे नागडे सत्य उघडे ; तीव्र निषेध करीत शिवसेना (ठाकरे) संगमनेरचे जोडेमारो आंदोलन !

प्रतिनिधी —

राज्यातील विविध पक्षांच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करून त्यांचे वस्त्रहरण करणाऱ्या भाजप नेता किरीट सोमय्या यांचे कथित अश्लील व्हिडिओ समोर आल्यानंतर राज्यात राजकीय वर्तुळात संतापाची लाट उसळली आहे. मंगळवारी दुपारी संगमनेरमध्ये शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी देखील बस स्थानक चौकात किरीट सोमय्याच्या प्रतिमेला जोडेमार आंदोलन केले. तसेच सोमय्याच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

किरीट सोमय्यांच्या लंपटपणाचा वृत्त वाहिनीच्या माध्यमातून पर्दाफाश झाला आहे. राजकीय नेत्यांवर चिखल फेक करणाराच चिखलात लोळत पडल्याच्या प्रतिक्रिया समोर येत आहे. सोमय्यांचे चाळे समोर येताच सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.

संगमनेरमध्ये मंगळवारी दुपारी बस स्थानक चौकात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मुजीब शेख, तालुकाप्रमुख भाऊसाहेब हासे व संजय फड, शहर प्रमुख अमर कतारी यांच्यासह महिला पदाधिकारी शीतल हासे, आशा केदारी, संगीता गायकवाड, वैशाली वडतल्ले आदींच्या नेतृत्वाखाली सोमय्या यांच्या प्रतिमेला जोडमार आंदोलन करण्यात आले यावेळी स्त्रीलंपट सोमय्या याच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. अश्लील कृत्य करणाऱ्या सोमय्यांची भाजप पक्षातून त्वरित हकालपट्टी करून त्याच्यावर योग्य ती पोलीस कारवाई करावी या मागणीसाठी संगमनेर शिवसेनेच्यावतीने आंदोलन करण्यात आले.

यावेळी शिवसेना शहर प्रमुख अमर कतारी यांनी तीव्र शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या व किरीट सोमय्या यांचा निषेध व्यक्त केला. त्यांची भाजप पक्षातून त्वरित हकालपट्टी करण्याची मागणी केली.

उत्तर नगर जिल्हा प्रमुख मुजीब शेख यांनी देखील सदर कृत्याचा निषेध व्यक्त केला. तालुकाप्रमुख भाऊसाहेब हासे यांनी सोमय्या दिसेल तिथे काळे फासण्याचे जाहीर केले. यावेळी महिला आघाडीच्या पदाधिकारी तालुका संघटिका शीतल हासे, आशा केदारी, संगीता गायकवाड, वैशाली वडतल्ले यांनीदेखील आपल्या भावना व्यक्त करीत सोमय्या यांच्या प्रतिमेस जोडे मारून आपला राग व्यक्त केला.

ज्येष्ठ शिवसैनिक रावसाहेब गुंजाळ यांच्यासह युवासेना जिल्हाप्रमुख अमित चव्हाण, युवासेना शहर प्रमुख गोविंद नागरे, अमोल डुकरे, अक्षय बिल्लाडे, शोएब शेख, विजय सातपुते, राजू सातपुते, उपशहर प्रमुख दीपक वनम, अजीज मोमीन, प्रकाश क्षत्रिय, युवा सेनेचे योगेश खेमनर, लखन सोन्नर, शिवसैनिक विकास डमाळे, शरद कवडे, सचिन साळवे, अक्षय गाडे यांनी जोरदार घोषणाबाजी केली व सोमय्याचा निषेध व्यक्त केला.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!