बाळासाहेबांचे विचार, एकनाथ शिंदेंचे नेतृत्व अन् शिवसैनिकांचा स्वाभिमान !

सामान्य कार्यकर्त्याला नेतृत्वाची संधी, संघर्षाला सन्मान आणि हिंदुत्वाच्या विचारांचा समर्थ वारसा !

 

महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक इतिहासात हिंदुहृदयसम्राट वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्थान अढळ आहे. मराठी माणसाच्या अस्मितेला बुलंद आवाज देणारे, अन्यायाविरुद्ध संघर्षाची प्रेरणा देणारे आणि लाखो शिवसैनिकांच्या मनात स्वाभिमानाची ज्योत पेटवणारे बाळासाहेब हे केवळ एक नेते नव्हते, तर एक विचारधारा होते.

१९ जून १९६६ रोजी शिवसेनेची स्थापना करून त्यांनी मराठी माणसाला संघटित शक्ती दिली. हिंदुत्वाची ठाम भूमिका, मराठी माणसाच्या हक्कांसाठीचा संघर्ष, कार्यकर्त्यांवरील अपार प्रेम आणि निर्भीड नेतृत्व ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये होती. पदापेक्षा निष्ठा, सत्तेपेक्षा संघटना आणि राजकारणापेक्षा सामान्य माणसाचा स्वाभिमान त्यांनी नेहमीच महत्त्वाचा मानला.

बाळासाहेबांनी दिलेला भगवा विचार आणि शिवसैनिकांच्या स्वाभिमानाचा वारसा आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्यनेते मा. एकनाथजी शिंदे साहेब समर्थपणे पुढे नेत आहेत. सामान्य कार्यकर्त्याला संधी देणे, त्याच्या संघर्षाला बळ देणे आणि त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे, हे त्यांच्या नेतृत्वाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.

याचे संगमनेरमधील उदाहरण म्हणजे आमदार अमोलभाऊ खताळ ! सामान्य कुटुंबातून पुढे आलेल्या अमोलभाऊंना मिळालेली नेतृत्वाची संधी ही सामान्य शिवसैनिकाच्या कर्तृत्वाला मिळालेल्या सन्मानाचे प्रतीक आहे. नेतृत्व हे घराण्याने किंवा पैशाने नव्हे, तर संघर्ष, निष्ठा, कर्तृत्व आणि जनतेच्या विश्वासाने निर्माण होते, हा बाळासाहेबांचा विचार त्यांच्या प्रवासातून अधोरेखित होतो.

शहरप्रमुख म्हणून काम करताना मला जाणवते की, बाळासाहेबांचे विचार केवळ भाषणातून मांडून चालणार नाहीत, तर ते कृतीतून जगावे लागतील. सामान्य नागरिकांच्या अडचणींसाठी धावून जाणे, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे, गोरगरीबांच्या मदतीला उभे राहणे आणि प्रत्येक कार्यकर्त्याला सन्मान देणे, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.

आज राजकीय परिस्थिती बदलत असली, तरी बाळासाहेबांनी शिवसैनिकांच्या मनात रुजवलेली निष्ठा, स्वाभिमान आणि संघर्षाची प्रेरणा कधीही कालबाह्य होणार नाही. कारण शिवसैनिक होणे म्हणजे केवळ भगवा झेंडा हातात घेणे नव्हे, तर संकटात सामान्य माणसाच्या पाठीशी उभे राहणे, दिलेला शब्द पाळणे आणि संघटनेशी प्रामाणिक राहणे होय.

बाळासाहेब आज देहाने आपल्यात नसले, तरी त्यांचे विचार प्रत्येक शिवसैनिकाच्या मनात जिवंत आहेत. एकनाथ शिंदे साहेबांचे नेतृत्व आणि आमदार अमोलभाऊ खताळ यांच्यासारख्या सामान्य कुटुंबातून पुढे आलेल्या लोकप्रतिनिधींचा प्रवास हा त्याच विचारपरंपरेची ताकद अधोरेखित करतो.

बाळासाहेबांचे विचार हीच आमची प्रेरणा, भगवा हा आमचा अभिमान आणि सामान्य माणसाची सेवा हाच आमचा धर्म !

वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन ! जय महाराष्ट्र !

विनोद मनोहर सूर्यवंशी, शहरप्रमुख, शिवसेना

संगमनेर शहर

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!