ॲसिड हल्ला पीडित मुलीच्या कुटुंबाला रमजान ईद निमित्त मुस्लिम समाजाची भेट व मदतीचा हात 

संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क 

संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथे तीन दिवसांपूर्वी एका बारा वर्षीय शाळकरी मुलीवर झालेल्या अमानुष ऍसिड हल्ल्याच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रभर संतापाची लाट उसळली होती. विविध स्तरांतून या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला असून आरोपीवर कठोर कारवाईची मागणीही होत आहे. सध्या सदरील मुलगी रुग्णालयात उपचार घेत असून तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.

या पार्श्वभूमीवर रमजान ईदच्या निमित्ताने संगमनेर शहरातील मुस्लिम बांधवांनी आज पीडित मुलीच्या घरी भेट देऊन कुटुंबीयांची विचारपूस केली. या प्रसंगी कुटुंबीयांना धीर देत, “या कठीण प्रसंगी आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत,” अशी ग्वाही देण्यात आली. तसेच, समाजाच्या वतीने कुटुंबाला आपुलकीचा हात देत आर्थिक मदतही करण्यात आली.

यावेळी मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधींनी सांगितले की, “ही घटना अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक असून अशा गुन्हेगारांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे. समाज म्हणून आपण सर्वांनी एकत्र येत पीडित कुटुंबाला आधार देणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.”

या यावेळी संगमनेर शहरातील मुस्लिम समाजातील नगरसेवक, माजी नगरसेवक, विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!