समनापुर मध्ये दगडफेक…. 

सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल 

संगमनेर प्रतिनिधी दि. – 18 

संगमनेर तालुक्यात असणाऱ्या समनापुर येथे कादर शहावली संदल मिरवणुकीच्या वेळी दोन गटात भांडणे झाली होती व त्यावेळी मोठ्या प्रमाणावर दगडफेक करण्यात आली ही दगडफेक करणाऱ्यांमध्ये सहभागी असणाऱ्या सात जणांवर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सनी गोविंद कडलग, महेश मच्छिंद्र रोकडे, रोहित रोकडे, नटराज जाधव, चैतन्य संजय बोराडे, रुद्र राजू रोकडे, शिवा राजू रोकडे या सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

समनापुर येथे कादर शहावली संदल पाहण्यासाठी फिर्यादी गेले असता तेथे दोन गटात भांडण होऊन दगडफेक झाली होती. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. या दगडफेकी मध्ये आरोपींनी गैर कायद्याची मंडळी जमवून मोठा धुमाकूळ घातला होता. मोठ्या प्रमाणावर दगडफेक केली होती. या दगडफेकीमुळे फिर्यादीच्या डाव्या पायाच्या नडगीला दगड लागून मोठी दुखापत झाली आहे. त्यामुळे पंकज गोरक्षनाथ नेहे (राहणार समनापुर, निळवंडे रोड तालुका संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!