सर्वसमावेशक समाजकारणामुळे तालुक्याचा शाश्वत विकास –

महाराष्ट्राच्या महसूल विभागाचा डिजिटल पॅटर्न देशात जाणार

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

घुलेवाडी येथे ग्रामपंचायत सह विविध विकास कामांचे लोकार्पण

प्रतिनिधी —

संगमनेर तालुक्यातील जनतेने आपल्यावर कायम प्रेम केले आहे. त्यामुळे सलग आठ वेळा विजय होऊन आपण विधानसभेत प्रतिनिधित्व करत आहोत. यामध्ये सर्वसामान्य जनतेचे मोठे श्रेय आहे. येथे कायम अविश्रांत व सर्वसमावेशक समाजकारण असल्याने तालुक्याचा शाश्वत विकास झालाआहे. महसूल विभागामध्ये राबवलेली संगणकीय व डिजिटल प्रणाली ही संपूर्ण देशासाठी महाराष्ट्राचा पॅटर्न म्हणून देशात जाणार असे प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री  बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

घुलेवाडी येथे ग्रामपंचायत कार्यालयाचे लोकार्पण व विविध विकास कामांचा शुभारंभ थोरात यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माधवराव कानवडे होते. तर व्यासपीठावर नगराध्यक्ष दुर्गा तांबे, महानंदचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख, सभापती सुनंदा जोर्वेकर, जिल्हा परिषद सदस्य सिताराम राऊत, उपसभापती नवनाथ अरगडे, भाऊसाहेब कुटे, रामहरी कातोरे ,मिलिंद कानवडे, अशोक हजारे, सरपंच दत्तू राऊत, उपसरपंच हरी ढमाले, सुनीता  अभंग, निर्मला गुंजाळ, मच्छिंद्र राऊत,भाऊसाहेब सातपुते, चंद्रकांत क्षिरसागर यांसह उपस्थित होते.

थोरात म्हणाले की, संगमनेर तालुक्यात सातत्याने विकासाच्या योजना राबवल्या आहेत. महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर निळवंडे कालव्यांच्या कामाला गती दिली. दोन जेसीबी कार्यरत होते तेथे आता ३५ जेसीबी व यंत्रणा रात्रंदिवस काम करत आहेत. या वर्षात सातशे कोटी रुपयांचा निधी मिळवला. लवकरात लवकर दुष्काळी भागाला पाणी देणे हा आपला ध्यास आहे. घुलेवाडी गावचे शहरीकरण वाढते आहे. पिण्याच्या पाण्याचे प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने काम झाले आहे.

संगमनेर शहराला जोडणाऱ्या चौपदरी रस्त्यांमुळे शहराचे वैभव वाढणार आहे. विविध सहकारी संस्था, वेगाने होत असलेली विकासकामे, पायाभूत सुविधा शैक्षणिक ,सामाजिक व सांस्कृतिक वातावरण यामुळे संगमनेर तालुका हा प्रगतीमध्ये अग्रगण्य आहे. सर्वसमावेशक राजकारण व समाजकारण यामुळे येथे शाश्वत विकास झाला आहे. हीच परंपरा आपल्या सर्वांना कायम ठेवायची आहे.

महसूल विभागात ई फेरफार, ऑनलाईन सातबारा, डिजिटल सातबारा असे अनेक उपक्रम राबवले आहेत. येत्या काही दिवसांमध्ये संगणकीय मोजणी होणार आहे. त्यामुळे तातडीने व बिनचूक मोजणी ही प्रणाली नव्याने लागू होणार आहे. महसूल विभागामध्ये केलेले हायटेक बदल व त्यामुळे नागरिकांना मिळत असलेली सुविधा याचे अनुकरण राजस्थानसह नव्याने पाच राज्य करत आहेत. महाराष्ट्राच्या महसूल विभागाच्या कामाचा पॅटर्न हा लवकरच देशात जाईल असेही ते म्हणाले.
सिताराम राऊत म्हणाले की, प्रत्येक वाडी-वस्तीवर  विकासाच्या योजना राबवल्या आहेत. घुलेवाडी गावांचा पाणी प्रश्न सोडवला आहे. घुलेवाडी मध्ये जास्तीत जास्त नागरिकांचा राहण्यास प्राधान्य असल्याने येथे सुविधांचा भर द्यावा लागणार आहे. राजकारण करताना मतभेद व्हायला नको. सर्वांनी मिळून मिसळून थोरात यांच्या पाठीशी उभे राहावे असे ते म्हणाले

सुनंदा जोर्वेकर म्हणाल्या की, माझ्यासारख्या सामान्य गृहिणीला थोरात यांनी पंचायत समितीचे सभापती देऊन मोठा सन्मान केला आहे. अत्यंत कमी कालावधीमध्ये मोठा निधी या विभागांमध्ये देऊन मोठ-मोठी विकास कामे मार्गी लागली आहेत. यावेळी सुनील राऊत यांनीही मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमासाठी जयश्री दुशिंग, सुवर्णा वाकचौरे, दिलीप पराड, परिगा दरेकर,भाऊसाहेब पानसरे, सविता असणे, मंगल राऊत, चंद्रकांत पानसरे, निकिता बाविस्कर, सरिता राजू खरात, पुंजाबाई पावबाके, जिजाबाई सातपुते, ग्रामसेवक सुभाष कुटे,भास्कर पानसरे, वैशाली राऊत, राजू खरात, भाऊसाहेब पानसरे, विवेक पानसरे, प्रांत अधिकारी डॉ.शशिकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे आर आर पाटील उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच दत्तू राऊत यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले. तर मच्छिंद्र राऊत यांनी आभार मानले. यावेळी घुलेवाडी येथील युवक, कार्यकर्ते, ग्रामस्थ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते..

बैलगाडी मिरवणूक ठरली लक्षवेधी

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी घुलेवाडी मध्ये अनेक मोठी विकास कामे मार्गी लावली असून त्यांची पारंपरिक पद्धतीने बैलगाडी मध्ये मिरवणूक काढण्यात आली. पाच बैलगाड्या सजवून झालेली ही मिरवणूक अत्यंत लक्षवेधी ठरली

RRAJA VARAT

2 thoughts on “महाराष्ट्राच्या महसूल विभागाचा डिजिटल पॅटर्न देशात जाणार ; महसूल मंत्री बाळासाहेब थोरात”
  1. संगमनेर जोर्वेनाका ते जोर्वे रस्ता रुंदी करून चौपदरीकरण व्हायला हवे. अहमदनगर जिल्हा डेव्हलपमेंट प्लॅनचे नुतनीकरण केले पाहिजे. पुणे नाशिक रेल्वे नियोजित संगमनेर रेलवे स्टेशन जोर्वे रस्त्यावर दाखवलेले आहे

  2. पुणे नाशिक रेलवे लाइन टाकताना पुणे नाशिक लोकल सेवा देखील विचार केला पाहिजे. रोजगार निर्माण होईल व शेती व दुग्ध व्यवसाय वाढेल अशी अपेक्षा आहे. नाशिक मुंबई पुणे त्रिकोण रस्ता व रेलवे यांना चालना मिळेल असे माझे मत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!