पाझर तलाव दुरुस्तीसाठी १७ कोटी ११ लाख रुपये निधी मंजूर 
 
मुख्यमंत्री जलसंवर्धन योजना
प्रतिनिधी —
 संगमनेर तालुक्यातील विविध गावांमधील व वाडीवस्त्यांवरील पाझर तलावाच्या दुरुस्तीकरिता मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेअंतर्गत तिसर्‍या टप्प्यात १७ कोटी ११ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

संगमनेर तालुक्यातील १७१ गावे व २५३ वाड्या-वस्त्यांवर सातत्याने विकासाच्या योजना राबवल्या जात आहेत. रस्ते, पाणी, वीज याचबरोबर तालुक्यात मोठे साखळी बंधारे निर्माण केले आहेत.  थोरात जलसंधारण मंत्री असताना विविध नद्या, ओढे, नाले यावर मोठ्या प्रमाणात बंधारे निर्माण केल्याने तालुक्यांमध्ये बंधार्‍याची जाळे निर्माण झाले आहे. या बंधार्‍यामुळे त्या गावांमध्ये जलसमृद्धी निर्माण होण्यास मोठी मदत झाली आहे. या तलावांच्या दुरुस्तीसाठी मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेअंतर्गत देखभाल व दुरुस्ती करिता पहिल्या टप्यात ७ कोटी रुपयांचा निधी मिळवला होता. तर आता तिसर्‍या टप्प्यात  १७ कोटी ११ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.


यामध्ये संगमनेर तालुक्यातील खांबे येथील कुंड व चिमण मळई हे बंधारे, पिंपळगांव देपा येथील ५ नंबर, ३ नंबर  व ७ नंबर तलाव तसेच खंडेरायवाडी येथील पाझर तलाव, झोळे येथील म्हसोबा नाला पाझर तलाव, घारगांव येथील पाझर तलाव नंबर २, अकलापूर गावठाण, वनदेव म्हसवंडी व मळादेवी म्हसवंडी, सावरगांव घुले येथील उपळी बंधारा, सारोळे पठार, माळेगांव पठार , नांदूर खंदरमाळ, डोळासणे, कर्‍हे, जवळे कडलग, खळी, कौठे बु, सायखिंडी, हिवरगांव पठार, खांडगांव, माळेगांव हवेली, निळवंडे, मिरपूर, पिंपळदरा, पानोडी, वेल्हाळे, शेळकेवाडी,तळेगांव पाझर तलाव क्रं १,
खांडेगदरा, कौठे खु , कोळवाडे, सुतारमळा, झोळे, सावरचोळ, आश्‍वी बु, बिरेवाडी, करुले पाझर क्रं १ व २, रायतेवाडी, शिरापूर, येठेवाडी, मालदाड, सोनोशी, सावरगांग घुले, चिंचोली गुरव जतखाण, व पाझर तलाव क्र ३ , गुंजाळवाडी पठार, तिगांव, जवळे बाळेश्‍वर, खराडी, पोखरी बाळेश्‍वर, धुमाळवाडी, डोळासणे, मांची, कोकणगांव , उंबरी बाळापूर, पिंपळगांव देपा पाझर तलवा क्र २ , सावरगांवतळ, निमज, चिंचोली गुरव म्हसोबा तलाव, खळी, शेंडेवाडी, कौठे मलकापूर, लोहारे, सादतपूर, जांबूत तलाव क्रं २ व चंदनापूरी तामकडा या गावांतील पाझर तलाव कामांचा समावेश आहे.
या निधीतून या पाझर तलावांची दुरुस्ती करून सिंचनक्षमता पुनर्स्थापित करण्याच्या उद्देशाने जलसंधारण उपचार व बांधकामांची दुरुस्ती होणार आहे .यामुळे या गावांमधील पाणीसाठा वाढण्यास मोठी मदत होणार आहे.
      या निधीसाठी थोरात यांच्याकडे इंद्रजीत थोरात, कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, डेव्हलपमेंट विभागाचे शंकर ढमक व शेखर वाघ यांनी विशेष पाठपुरावा केला.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!