अमली पदार्थ मुद्देमाल अपहार प्रकरण

एलसीबीचे पोलीस निरीक्षक कबाडी यांची चौकशी होणार – विशेष पोलीस महानिरीक्षकांचे आश्वासन  

सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख यांच्या उपोषणाला यश

 संगमनेर टाईम्स न्यूज नेटवर्क —

,कबाडी यांच्याविरोधात चौकशी व कारवाईचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. सामाजिक कार्यकर्ते शाकिर शेख यांच्या उपोषणामुळे पोलीस प्रशासनाला झुकावे लागले असून, विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी यासंदर्भात लेखी आदेश देत कारवाईचे आश्वासन दिले आहे. दरम्यान पोलीस निरीक्षक कबाडी यांच्यावरील कारवाई मागणी यासंदर्भाने अहवाल अहिल्यानगर पोलीस अधीक्षकांनी विशेष पोलीस महानिरीक्षकांना पाठविला आहे.

या प्रकरणात शेख यांनी यापूर्वीच राज्याच्या गृहमंत्र्यांकडे तक्रार करून कबाडी यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. तसेच १५ एप्रिलपर्यंत ठोस कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा दिला होता. दरम्यान, नगरचे पोलीस अधीक्षक यांनी १५ एप्रिल रोजी चौकशी अहवाल विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे पाठविल्याचे पत्र शेख यांना दिले होते. मात्र, त्यावर समाधान न झाल्याने शेख यांनी १६ एप्रिल रोजी नाशिक येथे उपोषण सुरू केले.

या उपोषणाची गंभीर दखल घेत विशेष पोलीस महानिरीक्षक कराळे यांनी शेख यांच्याशी थेट चर्चा करून प्रकरणाची सविस्तर माहिती घेतली. त्यानंतर किरणकुमार कबाडी यांच्याविरोधात चौकशी करून आवश्यक ती कारवाई करण्यात येईल, असे लेखी आदेश देण्यात आले.

या आश्वासनानंतर शेख यांनी उपोषण स्थगित केले. मात्र, कारवाई न झाल्यास उच्च न्यायालयात दाद मागणार, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!