शिवसेनेचा (UBT) दणका !
आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर कॉटेज हॉस्पिटल कंपाउंड मधील आयुष्मान आरोग्य केंद्राला कडक सूचना
तालुका आरोग्य अधिकारी यांनी घेतली बैठक
प्रतिनिधी —
संगमनेर नगरपालिकेच्या आवारात असणाऱ्या हॉटेल हॉस्पिटलच्या कंपाउंड मधील आयुष्यमान आरोग्य मंदिर केंद्राच्या कारभाराबाबत शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) संगमनेर यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतर. तालुका आरोग्य अधिकारी यांनी केंद्राचे मेडिकल ऑफिसर सर्व कर्मचारी यांची तातडीची बैठक घेऊन योग्य त्या कडक सूचना दिल्या आहेत.

या बैठकीला तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सुरेश घोलप यांच्यासह केंद्राचे आरोग्य अधिकारी, कर्मचारी, माजी शहर प्रमुख अमर कतारी, युवा सेनेचे अमित चव्हाण, इम्तियाज शेख आदी उपस्थित होते.
यावेळी सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना चांगले काम करण्याची तम्बी देत तालुका आरोग्य अधिकारी यांनी खालील प्रमाणे सूचना दिल्या.

– सर्व कर्मचारी व अधिकारी यांनी वेळेत कामावर येवून कामाच्या वेळेत पूर्ण वेळ काम करणे, गृहभेटी, लसीकरण करणे बाबत सूचना दिल्या.
– लसीकरण वेळेत सुरू करणे, लाभार्थींना लसिबाबत माहिती देणे, लसीकरणाच्या परिणामाबाबत सूचना देणे, लसीकरणाच्या 4 संदेश देणे.
– लासिकरणानंतर लभरर्थ्याचा follow up घेणे.
– लसीकरणापासून कोणतेही लाभार्थी वंचित राहणार नाही याची खबरदारी घ्यावी.
– सर्व रूग्नांसोबत चांगले वागणे बाबत सूचना दिल्या
– कार्यक्षेत्रात भेटी देऊन कंटेनर सर्वे, खाजगी डॉक्टर भेटी देणे, साथरोग प्रतिबंध उपाययोजना राबवणे बाबत सूचना दिल्या. मागण्या मान्य झाल्यामुळे शिवसैनिकांनी समाधान व्यक्त करत पुढील होणारे आंदोलन स्थगित केले.

