नगरपरिषद निवडणुकीत दहशत व पैशाचा गैरवापर — आमदार खताळ

संगमनेर प्रतिनिधी —

संगमनेर नगरपरिषद निवडणुकीत मोठ्या प्रमाणात धनशक्तीचा वापर, दादागिरी आणि दहशतीच्या माध्यमातून मतदारांवर दबाव टाकून मतदान करण्यात आल्याचा गंभीर आरोप आमदार अमोल खताळ यांनी मतदारांचा आभार दौरा संपल्यानंतर माध्यमांशी बोलताना केला केला आहे. मात्र अशा परिस्थितीतही सूज्ञ मतदारांनी सत्य ओळखत महायुतीच्या उमेदवारांवर विश्वास ठेवला, त्याबद्दल आमदार खताळ यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

संगमनेर शहरातील संगमनेर शहरातील अशोक चौक, मेन रोड, कुंभार गल्ली, बाजारपेठ,जेधे कॉलनी चव्हाणपूरा, रंगार गल्ली चंद्रशेखर चौक, नेहरू चौक, घास बाजार, उपासनी गल्ली, साईनगर, घोडेकर मळा,माळीवाडा इंदिरानगर जनता नगर गणेश नगर गोविंद नगर आदी भागांतून खताळ व महायुतीच्या उमेदवारांनी नगरपरिषद निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना मतदान केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. आमदार खताळ यांच्या समवेत या आभार दौऱ्यात शिवसेनेचे शहर प्रमुख विनोद सूर्यवंशी, भाजप शहर अध्यक्ष पायल ताजणे, आरपीआय शहर अध्यक्ष कैलास कासार, महायुती कडून उमेदवारी केलेले अभिजीत पुंड, पुनम दायमा, उमेश ढोले, साक्षी सूर्यवंशी, प्रवीण कर्पे, नीता मोहरीकर, शोभा घुले, राहुल म्हस्के, संगीता गवळी, संगीता पुंड, शशांक नमन, मुकेश मुर्तडक, अक्षय वर्पे, विकास पुंड, भारत गवळी यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

आमदार खताळ म्हणाले की, संगमनेर नगरपरिषद निवडणुकीच्या काळात ज्या पद्धतीने दहशतीचे वातावरण निर्माण करण्यात आले आणि पैशाचा अमाप वापर झाला त्याचा गांभीर्याने विचार होणे आवश्यक आहे. तसेच लोकशाही प्रक्रियेत अशा प्रकारांना कोणतेही स्थान नसून मतदारांनी अशा प्रवृत्तींना बळी न पडता विवेक बुद्धीने निर्णय घ्यावा. केंद्रात आणि राज्यात महायुतीचे सरकार आहे. त्यामुळे संगमनेर शहराच्या विकासासाठी आपण कधीही कमी पडणार नाही. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी ज्या पद्धतीने वाटचाल करणे गरजेचे आहे त्या पद्धतीने पुढील काळात ठोस काम करण्यात येईल. संगमनेर नगरपरिषद निवडणुकीत भिती आणि दहशतीला न जुमानता ज्या मतदारांनी आमच्या वर विश्वास टाकून महायुतीच्या उमेदवारांना मतदान केले त्या सर्व मतदारांचे आभार मानणे हे आपले कर्तव्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

निवडणूक काळात माझ्यावर माजी आमदार व पदवीधर आमदारांनी अत्यंत खालच्या पातळीवर टीका केली. संगमनेरमध्ये दहशत वाढली, अमली पदार्थांचा प्रश्न निर्माण झाला, अशा प्रकारचे आरोप प्रत्यारोप करून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आला असा आरोपही आमदार खताळ यांनी केला. मात्र नगरपरिषदेचा निकाल जाहीर झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच प्रत्यक्षात त्यांच्याच नगरसेवकांकडून दहशत पसरविण्याचे प्रकार घडले, हे अत्यंत निंदनीय असल्याचे त्यांनी सांगितले.

संगमनेरकरांनी खोट्या अफवांना बळी न पडता सत्याची बाजू ओळखावी असे आवाहन करत आमदार खताळ म्हणाले की, हा तुमचा आमदार सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेला आहे आणि तुम्हीच मला निवडून दिले आहे. तरीही काही लोकांनी नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. अशा राजकारणाला जनता योग्य वेळी उत्तर देईल, असा विश्वासही व्यक्त करत ते म्हणाले की संगमनेर शहराच्या विकासासाठी सर्वसामान्य नागरिकांना सोबत घेऊन सकारात्मक व पारदर्शक राजकारण करण्याचा निर्धार आम्ही केला आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!