संगमनेर महाविद्यालयात आभासी पध्दतीने ‘राष्ट्रीय मतदार दिवस’ साजरा
प्रतिनिधि–
भारत निवडणूक आयोग व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या निर्देशानुसार संगमनेर महाविद्यालयात प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली आभासी पध्दतीने ‘ राष्ट्रीय मतदार दिवस ‘ साजरा करण्यात आला.

यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. राजेंद्र लड्ढा, उपप्राचार्य रविंद तासिलदार, मतदार नोडल ऑफिसर डॉ. श्रीनिवास भोंग, प्रा.डॉ.हरजित पंजाबी, दादासाहेब वाळे, विद्यार्थी प्रतिनिधी श्री रोशन फड, आकांक्षा सातपुते व प्रतिक पावडे यांच्या यांच्या समवेत हा कार्यक्रम पार पडला.
प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड यांनी राष्ट्रीय मतदार दिवस या कार्यक्रमानिमित्त सर्वाना शपथ दिली. तसेच कोविड-१९ चे सर्व नियमांचे पालन करुन सर्व शिक्षकेतर सहकारी यांनाही राष्ट्रीय मतदार दिवस निमित्त शपथ दिली.

भारत निवडणूक आयोग व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या निर्देशानुसार महाविद्यालयात निवडणूक साक्षरता क्लबची स्थापना करण्यात आली. या क्लबच्या मार्फत महाविद्यालयातर्फे आभासी पध्दतीने निबंध स्पर्धा घेण्यात आली. त्यासाठी ३७५ हून अधिक सहभागींनी सहभाग नोंदविला.
राष्ट्रीय मतदार दिवस या कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गायकवाड म्हणाले की, आपल्या देशातील लोकशाही संपूर्ण जगात भक्कम व यशस्वी असल्याचे सांगितले. भारत निवडणूक आयोगाची स्थापना २५ जानेवारी १९५० रोजी झाल्याने राष्ट्रीय मतदार दिवस दरवर्षी २५ जानेवारी रोजी संपूर्ण भारतात मोठया उत्साहाने साजरा केला जातो. या दिवसाचे महत्व विशद करताना त्यांनी सांगितले की, भारतातील प्रत्येक नागरीकाने आपल्या देशाच्या प्रत्येक निवडणूकीत सहभागी होऊन कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्याचे आवाहन केले. त्यासाठी भारतात डीजिटल ॲप विकसित केल्यास मतदानाचे प्रमाण वाढविता येईल. मतदानाच्या वेळी एक सुटी म्हणून न पहाता राष्ट्रीय कर्तव्य म्हणून आपले मतदान केले पाहिजे. त्यामुळे भारतीय लोकशाही अधिकाधिक परिपक्व होईल असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला.

मतदान नोडल ऑफिसर डॉ. श्रीनिवास भोंग यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आकांक्षा सातपुते व आभार प्रतिक पावडे या विद्यार्थ्यांनी केले.
युटयुब प्रसारणासाठी गुणवत्ता हमी कक्ष समन्वयक प्रा.श्रीहरी पिंगळे यांनी मार्गदर्शन केले. या कार्यकमाच्या यशस्वीतेसाठी भानुदास सोनवणे, तेजस देशमुख, सचिन चौधरी आदी शिक्षकेतर सहका-यांनी सहकार्य केले. या आभासी पध्दतीने झालेल्या कार्यक्रमासाठी विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त संस्थेचे अध्यक्ष प्रकाश क्षत्रिय, कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी, सचिव डॉ. अनिल राठी, खजिनदार राजकुमार गांधी, जनरल सेक्रेटरी सीए नारायण कलंत्री व व्यवस्थापनातील सदस्य यांनी शुभेच्छा दिल्या.
