विद्यार्थ्यांना वेळेत शैक्षणिक दाखले उपलब्ध करून देण्यासाठी संगमनेर महसूल विभागाने घेतले शिबिर

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत १५० विद्यार्थ्यांना केले दाखल्यांचे वाटप

प्रतिनिधि —

महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या महा राजस्व अभियानाअंतर्गत उपविभागीय अधिकारी कार्यालय संगमनेर व तहसील कार्यालय संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थ्यांकरिता आवश्यक असणारे विविध शैक्षणिक दाखले विद्यार्थ्यांना किमान कागदपत्र व विहित वेळेत उपलब्ध करून देण्याकरिता १३ डिसेंबर २०२१ पासून संगमनेर तालुक्यातील सेतु केंद्रचालक व शाळा यांच्या सहकार्यातून महाराजस्व अभियाना अंतर्गत दाखले शिबिर आयोजित करण्यात आले होते.


सदर सुविधा अंतर्गत आज दिनांक २६ जानेवारी २०२२ रोजी मालपाणी विद्यालय संगमनेर येथे अंदाजीत १५० विद्यार्थ्यांना दाखले वाटप करण्यात आले. आता पर्यंत ७५० दाखले वितरीत करण्यात आले आहेत.

सद्यस्थितीत कोविड रोगाचा प्रादुर्भाव असल्याने केवळ ठरावीक विद्यार्थ्यांच्या उपस्थितीतच प्रातिनिधिक स्वरूपात 15 विद्यार्थ्यांना दाखले वितरण करण्यात आले.

महसूल विभागाच्या उपक्रमामुळे शालेय विद्यार्थ्यांची दाखले मिळवण्याची धावपळ थांबली आहे. तसेच शैक्षणिक दाखले मिळण्यासाठी विविध ठिकाणी करावी लागणारी पायपीट देखील थांबली आहे. महसूल विभागाच्या या उपक्रमाचे विद्यार्थ्यांकडून आणि शाळा संचालकांकडून स्वागत होत आहे.


सदर कार्यक्रमास संगमनेर उपविभागीय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम, मालपाणी विद्यालयाचे सचिव सतीश लाहोटी, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका
रंजना रहाणे, नायब तहसीलदार श्रीकांत लोमटे, सेतू केंद्र चालक रियाज शेख उपस्थित होते.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!