लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४

नामनिर्देशन पत्र दाखल करतांना निवडणूक प्रचारास मनाई

जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिबंधात्मक आदेश

प्रतिनिधी —

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठीची उमेदवारांकडून नामनिर्देशन पत्र दाखल करतांना आचारसंहितेचा भंग होऊ नये यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी परिसरात प्रचारास मनाई करण्यात आली आहे. फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ (२) नुसार जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.

लोकसभा निवडणूक प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडणे, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी नामनिर्देशन पत्र दाखल करतांना निवडणूक निर्णय अधिकारी परिसरात प्रतिबंधात्मक आदेश असणार आहेत.

निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल करते वेळेस वाहनांच्या ताफ्यामध्ये तीन पेक्षा जास्त मोटारगाड्या वाहने यांचा ताफ्यात समावेश नसावा. तसेच उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल करते वेळेस निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाच्या १०० मीटर परिसरात तसेच दालनात पाच व्यक्ती व्यतिरिक्त कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयात नामनिर्देशन पत्र दाखल करते वेळेस कार्यालयाच्या परिसरात मिरवणूक सभा घेण, कोणत्याही प्रकारच्या घोषणा देणे/वाद्य वाजविणे किंवा गाणी म्हणणे आणि कोणत्याही प्रकारचा निवडणूक प्रचार करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

शस्त्र बाळगण्यास मनाई

निवडणूक कालावधीत शस्त्र बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे. फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४  नुसार जिल्हाधिकारी यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.

लोकसभा निवडणूक प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडणे, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी शस्त्र बाळगण्याचे प्रतिबंधात्मक आदेश असणार आहेत. जिल्ह्यात महसूल स्थळ सीमेतील हद्दीत कोणाही इसमास निवडणूक काळात शस्त्र परवान्यावरील शस्त्रे जवळ बाळगून फिरण्यास, सार्वजनिक ठिकाणी बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!