आषाढी वारीतील आरोग्य सेवा शिबिरासाठी स्वयंसेवकांना टी-शर्ट व टोपींचे वितरण

अहिल्यानगर | प्रतिनिधी

पंढरपूर आषाढी वारी २०२६ निमित्त मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष, अहिल्यानगर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य सेवा शिबिर व चरणसेवा उपक्रमासाठी कार्यरत स्वयंसेवक डॉक्टर आणि रुग्णमित्रांना टी-शर्ट व टोपींचे वितरण निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांच्या हस्ते करण्यात आले. या साहित्याचे वितरण संबंधित रुग्णालये व महाविद्यालयांच्या प्रतिनिधींना करण्यात आले.

आषाढी वारीदरम्यान लाखो वारकऱ्यांना वेळेवर आरोग्य सेवा, प्रथमोपचार आणि चरणसेवा उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षामार्फत हा विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. स्वयंसेवकांची सहज ओळख व्हावी तसेच सेवाकार्य अधिक सुसूत्र आणि प्रभावीपणे पार पडावे, या उद्देशाने टी-शर्ट व टोपींचे वितरण करण्यात आले.

यावेळी तहसीलदार श्रीमती शोभा पुजारी, माहिती अधिकारी अमोल महाजन, सहाय्यक महसूल अधिकारी स्वप्नील फलटणे, महसूल सहाय्यक साईनाथ उप्पोड, संतोष साळवे, डॉ. विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटल, विळदघाट येथील श्रीमती काळे, डॉ. रेहान शाह तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष, अहिल्यानगरचे स्वप्नील कच्छवे आदी उपस्थित होते.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!