लोकसभा निवडणूक दरम्यान खोटे मेसेज व फेकन्युजची माहिती देण्यासाठी स्वतंत्र क्रमांक जाहीर
प्रतिनिधी —
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या कालावधीमध्ये उमेदवारांची प्रचारा दरम्यान बदनामी करणे, अफवा पसरविणे, द्वेषपुर्ण संदेश, खोटे संदेश तसेच प्रिंट मिडिया, इलेक्ट्रॉनिक मिडिया, सोशल मिडियाद्वारे प्रसारित होणाऱ्या फेकन्युजची माहिती जनतेकडून मिळण्यासाठी स्वतंत्र मोबाईल क्रमांक जाहीर करण्यात आला आहे.

या क्रमांकावर सर्वसामान्य जनतेला देखील माहिती देता येईल. तक्रारदाराने खाली दिलेल्या नंबर वर संपर्क करावा अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे नागरिकांना तक्रार करण्या साठीचा नंबर पुढील प्रमाणे आहे.
9156438088 या क्रमांकावर जनतेकडून मिळालेल्याउए माहितीची नियंत्रण कक्षातील प्रभारी नियंत्रण अधिकाऱ्यांनी पोलिस निरीक्षक (सायबर) यांच्या मदतीने माहितीची शहानिशा करुन आावश्यक ती कारवाई करावी. असेही पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे.

शासकीय कार्यालये, शासकीय विश्रामगृह कार्यालय परिसरात मनाई आदेश जारी
जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पाडण्याच्यादृष्टीने जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये दि. 16 मार्च ते 13 मे, 2023 या कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालय, सर्व उप विभागीय अधिकारी कार्यालये, सर्व तहसिल कार्यालये तसेच शासकीय विश्रामगृह येथे कोणत्याही प्रकारची मिरवणूक, मोर्चा काढणे, आंदोलन करणे, उपोषण करणे, कोणत्याही प्रकारच्या घोषणा देणे, वाद्य वाजविणे किंवा गाणे म्हणणे, कोणत्याही प्रकारचा निवडणूक प्रचार करण्यास बंदी घालण्यात आली असल्याचे आदेशाद्वारे कळविले आहे.
